शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

बारामतीला मिळणार २४ तास पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 4:09 AM

लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : बारामती शहराला आता २४ तास पाणीपुरवठा मिळण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. शुक्रवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बारामती : बारामती शहराला आता २४ तास पाणीपुरवठा मिळण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. शुक्रवारी (दि २८) बारामती नगरपालिकेच्या आॅनलाईन झालेल्या सर्वसाधारण सभेत बारामतीच्या बृहत पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पासह शहराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पांच्या उभारणीनंतर शहराचा चेहरामोहराच बदलणार आहे.

नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. सन २०५३ पर्यंत बारामतीची वाढणारी लोकसंख्या लक्षात घेवुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेनुसार ही योजना आखण्यात आली आहे. जवळपास १५५ कोटी रुपये या प्रकल्पासाठी खर्च होणार आहे. हा प्रकल्पा कार्यान्वित झाल्यानंतर बारामतीकरांना आठवड्याचे सात दिवस चोवीस तास पिण्याचे पाणी पुरविण्याचे नगरपालिकेचे नियोजन आहे. यात ७५ टक्के रक्कम राज्य शासन अनुदानाच्या रुपाने देणार आहे,तर २५ टक्के रक्कम नगरपालिकेला भरायची आहे. शहराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या प्रकल्पाला आज अखेर मंजुरी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूरी देण्यात आली.

विषय क्रमांक १८ वरील चर्चेनंतर विषय क्रमांक १९ ते विषय क्रमांक २९ पर्यंतचे विषय राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी चर्चेविनाच एकमुखी मंजूर करण्यात आले. त्यानंतरच्या विषयांवर कोणतीच चर्चा झाली नाही. नटराज नाट्य कला मंडळास जागा देण्याच्या विषयाला विरोधी पक्षनेते सुनील सस्ते यांनी विरोध दर्शविला.

यावेळी पार पडलेल्या सभेत तांदुळवाडी हद्दीतील रेल्वे भुयारी मार्गालगतचे रस्ते करणे, इंदापूर चौकात शॉपिंग सेंटर बांधकामाच्या सुधारीत अंदाजपत्रकास मान्यता, वसंतराव पवार नाट्यगृह व कॉम्प्लेक्सच्या सुधारीत अंदाजपत्रकास मान्यता, सर्व्हे क्रमांक २२० मधील कॉम्प्लेक्सच्या सुधारीत अंदाजपत्रकास मान्यता, जळोची, तांदूळवाडी, रुई व बारामती ग्रामीण व मुळ हद्दीतील रस्त्याची कामे, पंचायत समिती ते गौतमनगर अंडरपास बांधणे कार्यान्वयन यंत्रणेत बदलास मंजुरी,आशा स्वयंसेविकांना मानधन अदा करण्यास मान्यता,नटराज नाट्य कला मंडळास ३४०८ चौ.मी. जागा दीर्घ मुदतीने नाममात्र दराने देणे, संत जगनाडे कॉम्प्लेक्सवर एक मजला उभारणे, साळवेनगरमधील रहिवाशांना तात्पुरते पुनर्वसन केंद्र निर्माण करणे, नगरपालिका हद्दीतील ओढे मोजणी करुन हद्द कायम करून ओढे विकसित करणे, क-हानदीत संरक्षक भिंतीचा निधी क-हा नदी सुशोभीकरणासाठी वर्ग करणे, अल्पसंख्याक योजनेतून १ कोटी ९० लाखांच्या कामास मान्यता, कण्हेरी येथे शिवसृष्टीसाठी गट नंबर १९८, २३९, २४० भूसंपादन करणे आदी विषयांना मंजुरी देण्यात आली.