शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

‘अजितदादां'च्या इशाऱ्याकडे बारामतीकरांचेच दुर्लक्ष; उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकच झुंबड 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 2:15 PM

कोरोनाचे संकट पुन्हा वाढल्याने नागरिकांनी कमालीची काळजी घ्यायला हवी. अन्यथा पुन्हा काही कठोर निर्णय नाईलाजाने घेण्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता.

ठळक मुद्दे‘सोमेश्वर’च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास इच्छुकांची झुंबड 

बारामती : राज्यात कोरोनाच संकट पुन्हा वाढल्याने नागरिकांनी कमालीची काळजी घ्यायला हवी. अन्यथा पुन्हा काही कठोर निर्णय नाईलाजाने घेण्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवघ्या दोन दिवसांपूर्वी बारामतीकरांना दिला आहे. मात्र, उपमुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाल्याचे चित्र बारामतीत सोमवारी (दि.२२) पाहावयाला मिळाले. कोरोनाच्या नियमांचा सर्वांनाच विसर पडल्याचे चित्र आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांनी शनिवारी (दि. २० ) बारामतीत पार पडलेल्या विविध कार्यक्रमात कोरोनाबाबत काळजी घेण्याचे आवाहन केले होते. कोरोनाची भीती संपल्यासारखे अनेकजण मास्क न वापरता वावरत आहेत. मास्कचा वापर, सॅनिटायझर्सचा वापर करणे सोशल डिस्टन्सिंग पाळणे, शासनाने गर्दीबाबत दिलेल्या सूचनांचे पालन करणे आदी नियमावलीचे सर्वांनी पालन करावे. एकदा कोरोना झाला की पुन्हा कोरोना होणारच नाही, अशा समजूतीत राहू नका, दोनदा नाही काहींना तर तीनदा कोरोना झाल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्या,असा इशारा देखील पवार यांनी दिला होता.या कार्यक्रमाला अवघे दोन दिवसच उलटले आहेत.मात्र,त्या आवाहनाचा बारामतीकरांना जणु विसरच पडला आहे. 

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुक प्रक्रिया सुरु आहे. सोमवारी(दि २२) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे प्रशासकीय भवनमध्ये अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची झुंंबड उडालेली पहावयास मिळाले. कोरोनाच्या नियमांकडे देखील सर्वांनीच दुर्लक्ष केल्याचे दिसुन आले.——————————————————

शासकीय कार्यालयामध्ये अनावश्यक गर्दी करणारावर कारवाई करण्यात येणार आहे.  सध्या नियम मोडणाऱ्यांवर दिवसाला 300 च्यावर केसेस दाखल होत आहेत. मंगल कार्यालये,  हॉटेल व्यावसायिक यांना देखील सूचना दिल्या आहेत. 50 व्यक्ती च्या ज्या ठिकाणी गर्दी दिसेल त्यांची पथकामार्फत तपासणी करून कारवाई करण्यात येईल. 

- नारायण शिरगांवकर, उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती उपविभाग

टॅग्स :Baramatiबारामतीcorona virusकोरोना वायरस बातम्याElectionनिवडणूकAjit Pawarअजित पवार