बारामतीचा ‘दादा’ बदला, युगेंद्र पवार यांच्यासाठी शरद पवारांना गळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 08:58 AM2024-06-12T08:58:09+5:302024-06-12T08:58:43+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी परिश्रम घेणारे युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभेची उमेदवारी द्या आणि बारामतीचा ‘दादा’ बदला, अशी मागणी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी केली. 

Baramati's 'Dada' revenge, Sharad Pawar's death for Yugendra Pawar | बारामतीचा ‘दादा’ बदला, युगेंद्र पवार यांच्यासाठी शरद पवारांना गळ

बारामतीचा ‘दादा’ बदला, युगेंद्र पवार यांच्यासाठी शरद पवारांना गळ

 बारामती - सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी परिश्रम घेणारे युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभेची उमेदवारी द्या आणि बारामतीचा ‘दादा’ बदला, अशी मागणी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी केली. 
शरद पवार सध्या तीनदिवसीय बारामती दाैऱ्यावर आहेत. मंगळवारी सकाळी गोविंदबाग निवासस्थानी पवार गटाचे कार्यकर्ते पोहचले. त्यांनी पवार यांची भेट घेत युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी केली.  

बारामतीचा इतिहास
- २०१९ मध्ये अजित पवार 
१,६५,२६५ एवढ्या विक्रमी मताधिक्क्याने निवडून आले होते.
- भाजपचे गोपीचंद पडळकर यांना ३०,३७६ मते पडली होती.
- १९९५ पासून अजित पवार बारामतीतून सलग सहावेळा निवडून आले आहेत.
- १९७२ ते १९९० शरद पवार यांनी बारामतीचे नेतृत्व केले.

काका-पुतण्या लढत : युगेंद्र यांच्या नावावर शिक्कामोर्तब 
झाल्यास काका-पुतणे यांच्यात  लढत होऊ शकते. 

Web Title: Baramati's 'Dada' revenge, Sharad Pawar's death for Yugendra Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.