शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

बारामतीचे रुपडे पालटणार ; तब्बल ७११ कोटींचे अंदाजपत्रक सादर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 1:41 PM

आजपर्यंतच्या इतिहासात हे उच्चांकी अंदाजपत्रक

ठळक मुद्देशहराच्या सुशोभीकरणासाठी मिळणार भरघोस अनुदान बारामती नगरपालिकेला १२० कोटींचा भरघोस निधी आगामी काळात शहर झोपडपट्टीमुक्त दिसण्याचा विश्वास

बारामती : बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी सोमवारी नगरपरिषदेच्या सभागृहात अर्थसंकल्प मांडण्यात आला. जवळपास ७११ कोटींचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. आजपर्यंतच्या इतिहासात हे उच्चांकी अंदाजपत्रक आहे. शहराच्या सुशोभीकरणासाठी भरघोस अनुदान या अंदाजपत्रकात देण्यात आल्याने येत्या काळात बारामतीचे रूपडे पालटणार आहे.

अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे होत्या. बारामती शहरातील २०२०-२१ चा १५४ वा वार्षिक ७११ कोटींचा अहवाल आर्थिक संकल्प अंदाजपत्रक आज सादर करण्यात आले. यामध्ये शहरातील व हद्दवाढीमध्ये रस्ते, पाणी, घर, तांदूळवाडी येथील गट क्रमांक १०० मधील १५० एकर प्राणिसंग्रहालय, पक्षीनिरीक्षण, वनविहार व शहरातील स्वच्छता या मुख्य गोष्टींना प्राधान्य देण्यात आले आहे.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यावर बारामतीकरांना अच्छे दिन आले आहेत. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या हाती असणाऱ्या अजित पवार यांनी भरघोस मतांनी निवडून देणाऱ्या बारामतीकरांना विकासासाठी भरघोस निधी देऊ केल्याचे संकेत आहेत. बारामती नगरपालिकेला १२० कोटींचा भरघोस निधी दिला आहे. यापैकी ९५ कोटींचा पहिला हप्ता लवकरच नगरपालिकेकडे फेब्रुवारीअखेर जमा होणार आहे. या अर्थसंकल्पात नीरा डावा कालवा सुशोभीकरण, नदी सुधार प्रकल्प, पाणीपुरवठा योजना, प्राथमिक शाळा, घरकुल, शहरात सीसीटीव्ही बसवणे, शिवसृष्टी, नवीन साठवण तलाव, अग्निशामक गाडी खरेदी, राष्ट्रध्वज उभारणे ही कामे प्रास्ताविक केली आहेत. यामध्ये शहरातील रस्ते तर नवीन हद्दीत २५ कोटींचे रस्ते तसेच नवीन हद्दीत २५०० पथदिवे, अचानक पुरासारखी परिस्थिती उद्भवल्यावर परिस्थिती सुधारण्यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुस्लिम समाजाच्या शादीखान्यासाठी ५ कोटी रुपये, तांदूळवाडी, नीरा रोड, जळोची येथे उद्यान, टी. सी कॉलेजकडून आनंदनगरकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग, तसेच बारामतीकरांसाठी २४ तास पिण्याचे पाणी व यासाठी लवकरच नवीन साठवण तलाव बांधण्यात येणार आहे. शहर झोपडपट्टीमुक्त करण्याचा निर्णय आजच्या सभेत घेण्यात आला. तसेच शहीद जवानांच्या विधवा पत्नीला घरपट्टीमध्ये १०० टक्के व निवृत्त सैनिकांना ५० टक्के सूट मिळावी, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी केली. तर बारामती नगरपालिकेच्या मालकीच्या भाडेवसुलीचे काम चांगले नसल्याची खंत गुजर यांनी या वेळी व्यक्त केली. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. चांगली वसुली झाल्यास शहरातील स्वच्छतेच्या विषयावर आपल्याला लक्ष देत येईल, असेदेखील गुजर म्हणाले.तर विरोधी पक्षनेते सुनील सस्ते यांनी ७ व्या वेतन आयोगाचा लाभ काही कामगारांना मिळाला, तर काहींना मिळाला नाही, अशी विचारणा केली. भाजी मंडईमध्ये वसूल होणारे भाडे एजन्सी नेमून करावे, त्यावर चांगला फायदा होईल असे सस्ते म्हणाले. नगरसेवक गणेश सोनवणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमसाठी असणारा ५५ लाख निधी  १ कोटी करावा, अशी मागणी केली. मात्र, हा निधी ३ कोटी मंजूर झाला असल्याचे गटनेते सचिन सातव यांनी सांगितले.........

गटनेते सातव म्हणाले, आजपर्यंतच्या पालिकेच्या करकिदीर्तील हा ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे. अजित पवार यांच्यामुळे आपल्याला हा बहुमान आहे. पवार यांनी ९५ कोटी रुपये ठोकनिधी एका दिवशी मंजूर केला आहे. मागील काही वर्षे निधीअभावी अडचणी येत होत्या. मात्र, आता सत्ता असल्याने बारामतीचा पक्षविरहित विकास करायचा आहे. यामध्ये अत्याधुनिक स्वच्छतागृह, कºहा नदी सुशोभीकरण, नीरा डावा कालवा सुशोभीकरणासाठी, तसेच भिगवण रोडवर सर्व्हिस रोडवर चालण्यासाठी, सायकलिंगसाठी,व वृद्धांना बसण्यासाठी प्रदेशच्या धर्तीवर सुधारणा करण्याच्या आहेत. ...........

पालखी महामार्ग स्वच्छतेसाठी ४.५० कोटी रुपयांची यंत्रसामग्री आहे. तर उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ यांनी अजित पवार यांनी आमराई, पंचशीलनगर, तांदूळवाडी व इतर भागांतील झोपडपट्टी मुक्त करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगत येणाऱ्या काळात शहर झोपडपट्टीमुक्त दिसण्याचा विश्वास व्यक्त केला. सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष तावरे, उपनगराध्यक्ष बल्लाळ, गटनेते सातव, ज्येष्ठ नगरसेवक गुजर, नगरसेवक संजय संघवी  यांनी आपले मत व्यक्त केले.............

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवार