मोरगाव : बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील तरडोली, लोणी भापकर, पळशी, ढाकाळे, मुढाळे आदी भागात अद्याप दुष्काळी परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. कोरडे ओढे, तलाव, खोलावलेल्या विहिरी यामुळे रब्बीची पीक काही दिवसांचीच सोबती आहेत.रब्बी हंगामातील मलदांडी ज्वारीसाठी हा पट्टा प्रसिद्ध आहे. मात्र, यंदाही निसर्गाचा कोप झाला असल्याने कडब्यासह ज्वारीचे भाव वाढण्याची शक्यता आहे. नुकतेच नाझरे येथील मार्तंड जलाशय तुडुंब झाल्यानंतर तरडोली येथील तलाव भरण्याचे नियोजन कॅनॉलद्वारे केले होते. पण पाण्याचा या तलावापर्यंत एक थेंब ही आला नाही. याबाबत नाझरे येथील शाखा अभियंता सस्ते यांच्याशी संपर्क साधला असता निवडणूक ड्युटीमध्ये आहे, वरिष्ठांना विचारा, असे त्यांनी सांगितले. या भागातील हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्याच लोकांची पिकं जेमतेम पाण्यावर टिकून आहेत. तर उर्वरित पीक सर्वच शेतकऱ्यांची काही दिवसांचीच सोबती आहेत. यामुळे सर्वच भागात शेतकरी किमान बाटुक, फडा येण्यासाठी एका पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. (वार्ताहर)
बारामतीचा जिरायतीपट्टा कोरडाच
By admin | Published: October 10, 2014 6:25 AM