१९५२ पासून आतापर्यंत जे आमदार झाले त्यांनी केलेलं काम अन् मी केलेलं काम पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 19:36 IST2025-04-06T19:32:49+5:302025-04-06T19:36:39+5:30

त्यांनी काय कामे केली ते पाहा, आणि मी केलेलं काम पाहा. मी अजूनही काम करणार

baramti news Look at the work done by MLAs who have become MLAs since 1952 and the work I have done. | १९५२ पासून आतापर्यंत जे आमदार झाले त्यांनी केलेलं काम अन् मी केलेलं काम पाहा

१९५२ पासून आतापर्यंत जे आमदार झाले त्यांनी केलेलं काम अन् मी केलेलं काम पाहा

बारामती  -  बारामतीत आत्तापर्यंत मी जेवढं काम केलं तेवढं काम करणारा एकही आमदार तुम्हाला इथून पुढे मिळणार नाही. १९५२ पासून आतापर्यंत जे आमदार झाले त्यांनी काय कामे केली ते पाहा, आणि मी केलेलं काम पाहा. मी अजूनही काम करणार असं म्हणत अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना त्यांचे नाव न घेता टोला लगावला.

बारामतीत दिव्यांगांना मोफत सायकल वाटप करण्यात आली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हजेरी लावली.यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.यावेळी पवार पुढे म्हणाले, "बजेटमध्ये डीपीडीसीला 22000 कोटी दिले. त्यातला एक टक्का दिव्यांगांसाठी खर्च करण्याचा तरतूद केली आहे. दिव्यांगाना सहानभूती नको तर समान संधी पाहिजे. दिव्यांगाना पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आपण घेतल्याचे पवार म्हणाले.



दरम्यान, उपमुख्यमंत्री  पवार यांनी बारामती शहरात घडलेल्या  मारहाणीच्या घटनेवर चांगलाच संताप व्यक्त केला. संबंधित घटना ही सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अशा घटना वारंवार घडल्या तर आपण थेट मकोका लावू, असा इशाराच अजित पवारांनी दिला. अजित पवार हे त्यांच्या रोखठोक स्वभावामुळे ओळखले जातात. त्यामुळे आपल्या पक्षाशी संबंधित कुणीही असला आणि त्यांनी नियम मोडला, गैरकृत्य केलं तर त्यालाही गय केलं जाणार नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे, मी काय कायम तुमच्यासोबत नाही. काळाच्या पुढं काही करता येत नाही. पण काम करताना नीट करतो. त्यामुळे पुढची लोकं म्हणतील चांगलं काम केलं. परवा माझ्याकडे क्लिप आली. सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झालं. त्याच्यामध्ये एकाला मारहाण केली.

कुत्र्याला जसं मारत असतील तस मारलं. मी पोलिसांना सांगितलं, कोणीही असो त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. हे जर पुढे असं चालत राहिलं तर मी मोकको लावीन, आपली मुलं काय करत आहेत हे लक्ष ठेवणं पालकांची नैतिक जबाबदारी आहे. ती जबाबदारी पालकांनी पार पाडावी. मला काही लोकांचा फोन येतो की दादा पोटात घ्या. अरे काय पोटात घ्या, पोट फुटायला लागलं. ज्यांनी फोन केला त्यांना शरम कशी वाटत नाही, असं सांगायला. सगळ्यांना नियम सारखा,असे देखील पवार यांनी सुनावले

Web Title: baramti news Look at the work done by MLAs who have become MLAs since 1952 and the work I have done.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.