शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर; कोल्हापूर न्यायालयाचा निकाल
2
राहू-केतू मनुष्यावर काहीही परिणाम करत नाहीत; केळकरांच्या दाव्यावर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा आक्षेप
3
“मनसे म्हणजे जितनी चावी मारी उतना चले खिलोना, इशाऱ्यावर चालणारी संघटना”; उद्धवसेनेची टीका
4
“...तर सर्वांत आधी भाजपाची मान्यता रद्द करा, मनसे वगैरे नंतर”; संजय राऊत नेमके काय म्हणाले?
5
१४ महिन्यांची लव्ह स्टोरी, या गावातील तरुणासाठी तरुणी अमेरिका सोडून आली भारतात
6
राजकीय पक्षांना कोट्यवधींच्या देणग्या! भाजपच्या देणग्यांत २११ टक्के वाढ; काँग्रेसची स्थिती काय?
7
पाकिस्तानी सैन्याचा चीनसोबत डबल गेम; भडकलेल्या जिनपिंगनी दौराच रद्द केला
8
दोन दिवसांवर रिलीज असताना 'फुले' सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकललं, समोर आलं मोठं कारण
9
ट्रम्प यांच्या टेरिफ बॉम्बने चीनमध्ये खळबळ, समुद्रातच माल सोडून पळून जातायत ड्रॅगनचे एक्सपोर्टर्स!
10
वयाच्या २६ वर्षी UPSC परीक्षेत यश मिळवलं; कोण आहे फराह हुसैन? एकाच घरात ३ IAS, १ IPS
11
Mahaveer Jayanti 2025: एक अट्टल गुन्हेगार भगवान महावीरांच्या प्रेरणेने सन्मार्गी लागला, त्याची गोष्ट!
12
'पक्षाची कामे करायची नसतील तर निवृत्ती घ्या', खरगेंनी जाहीर सभेत काँग्रेस नेत्यांना खडसावले
13
संजय बांगरचा मुलगा लंडनमध्ये झाली मुलगी 'अनया'! मुलगा असताना असं होतं क्रिकेटचं रेकॉर्ड
14
चैत्र गुरु प्रदोष: शिव होतील प्रसन्न, गुरुचे मिळेल पाठबळ; कसे करावे व्रत? पाहा, सोपी पद्धत
15
झेप्टोवरून हापुस आंबे मागविले, अन् खेळ झाला! कंपनीने केला की डिलिव्हरी बॉयने? तुम्हीच सांगा...
16
महाराष्ट्राला पाच वर्षांत मिळाले नाही एकही नवीन केंद्रीय विद्यालय, अनेक राज्यांत ६० विद्यालये झाली सुरू
17
नौदलालाही राफेलची ताकद मिळणार! ६४००० कोटींच्या डीलला मंजुरी, किती विमाने अन् कधीपर्यंत येणार...
18
षष्ठग्रही ६ राजयोगात गुरुवारी प्रदोष: ६ राशींवर धनलक्ष्मी कृपा, सर्वोत्तम काळ; शुभ-लाभ!
19
मोठी बातमी! मस्साजोगमधील आवादा कंपनीला सुरक्षा व्यवस्था तैनात; १२ लाखांची झाली होती चोरी
20
VIDEO: "गाल एकदम लाल-लाल झालेत..."; यशस्वी जैस्वाल-शुबमन गिलचा मजेशीर संवाद

१९५२ पासून आतापर्यंत जे आमदार झाले त्यांनी केलेलं काम अन् मी केलेलं काम पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 19:36 IST

त्यांनी काय कामे केली ते पाहा, आणि मी केलेलं काम पाहा. मी अजूनही काम करणार

बारामती  -  बारामतीत आत्तापर्यंत मी जेवढं काम केलं तेवढं काम करणारा एकही आमदार तुम्हाला इथून पुढे मिळणार नाही. १९५२ पासून आतापर्यंत जे आमदार झाले त्यांनी काय कामे केली ते पाहा, आणि मी केलेलं काम पाहा. मी अजूनही काम करणार असं म्हणत अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना त्यांचे नाव न घेता टोला लगावला.बारामतीत दिव्यांगांना मोफत सायकल वाटप करण्यात आली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हजेरी लावली.यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.यावेळी पवार पुढे म्हणाले, "बजेटमध्ये डीपीडीसीला 22000 कोटी दिले. त्यातला एक टक्का दिव्यांगांसाठी खर्च करण्याचा तरतूद केली आहे. दिव्यांगाना सहानभूती नको तर समान संधी पाहिजे. दिव्यांगाना पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आपण घेतल्याचे पवार म्हणाले.दरम्यान, उपमुख्यमंत्री  पवार यांनी बारामती शहरात घडलेल्या  मारहाणीच्या घटनेवर चांगलाच संताप व्यक्त केला. संबंधित घटना ही सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अशा घटना वारंवार घडल्या तर आपण थेट मकोका लावू, असा इशाराच अजित पवारांनी दिला. अजित पवार हे त्यांच्या रोखठोक स्वभावामुळे ओळखले जातात. त्यामुळे आपल्या पक्षाशी संबंधित कुणीही असला आणि त्यांनी नियम मोडला, गैरकृत्य केलं तर त्यालाही गय केलं जाणार नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे, मी काय कायम तुमच्यासोबत नाही. काळाच्या पुढं काही करता येत नाही. पण काम करताना नीट करतो. त्यामुळे पुढची लोकं म्हणतील चांगलं काम केलं. परवा माझ्याकडे क्लिप आली. सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झालं. त्याच्यामध्ये एकाला मारहाण केली.कुत्र्याला जसं मारत असतील तस मारलं. मी पोलिसांना सांगितलं, कोणीही असो त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. हे जर पुढे असं चालत राहिलं तर मी मोकको लावीन, आपली मुलं काय करत आहेत हे लक्ष ठेवणं पालकांची नैतिक जबाबदारी आहे. ती जबाबदारी पालकांनी पार पाडावी. मला काही लोकांचा फोन येतो की दादा पोटात घ्या. अरे काय पोटात घ्या, पोट फुटायला लागलं. ज्यांनी फोन केला त्यांना शरम कशी वाटत नाही, असं सांगायला. सगळ्यांना नियम सारखा,असे देखील पवार यांनी सुनावले

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारBaramatiबारामती