शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
2
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
3
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
4
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
5
PM मोदींच्या नावे आणखी एक उपलब्धी; नायजेरियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
6
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
8
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
9
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
10
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
12
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
13
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
14
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
15
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
16
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
17
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
18
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
19
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
20
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर

बिल मंजूर करण्यासाठी ‘बार्टी’ने घेतली पार्टी; भीमा कोरेगाव इव्हेंट मॅनेजमेंटसाठी दाखवला ५० लाखांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2022 9:52 AM

दोनशेंची उठली पंगत

- धनाजी कांबळेपुणे:  केलेल्या कामाचे अडकलेले बिल मंजूर करून घेण्यासाठी एका कंत्राटदाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशाेधन आणि प्रशिक्षण  संस्थेच्या (बार्टी) अधिकारी वर्गाने नुकतीच भोजन पार्टी द्यायला भाग पाडले. यात संस्थेतील शे-दोनशे कर्मचारी- अधिकाऱ्यांनी ताव मारला. त्यांनी समाधानाचा ढेकर दिल्यावरच ५० लाखांच्या मंजूर निधीपैकी १४ ते १५ लाखांचे बिल मंजूर करण्यात आले.

भीमा कोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी कोरोनाच्या काळातही राज्यातील नागरिक उत्साहाने सहभागी झाले. या कार्यक्रमाच्या नियोजनातील एक जबाबदारी ‘बार्टी’कडे होती. त्यात ठरवलेल्या कंत्राटदाराने निकृष्ट जेवण दिले. या चुकीमुळे त्याचे बिल अडवण्यात आले. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिल मंजूर करवून घ्यायचे असेल, तर शानदार भोजन पार्टी झाली पाहिजे, असे ठेकेदारास सांगण्यात आले. त्यानुसार चूक-भूल माफीसाठी ठेकेदाराने ‘बार्टी’त नुकतीच पार्टी दिली. यात  सुमारे दोनशे कर्मचारी-अधिकाऱ्यांची पगंत बसली होती. चुकीचे परिमार्जन केल्यानंतरच ५० लाखांच्या मंजूर निधीपैकी १४ ते १५ लाखांचे बिल मंजूर करण्यात आले. तुम भी खुश, हम भी खुश!

कोणत्याही वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध न करता ‘वशिल्या’तून जवळ आलेल्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले होते. ५० लाखांपैकी यातील एक धनादेश २१ जानेवारीचा, तर एक धनादेश २५ जानेवारीचा आहे. भीमा कोरेगाव येथे असलेले स्वयंसेवक आणि कर्मचारी यांच्यासाठी टी-शर्ट, टोपी, आय कार्ड लेस, होल्डर आणि पोलवरून जाहिरात करण्यासाठी क्रिएटिव्ह ग्राफिक्सला ५ लाख ७७ हजार ९९९ रुपयांचे बिल आहे.

तसेच भोजन व्यवस्थेसाठी इंद्रायणी स्वीट कॉर्नर भोसरी या नावाने ९ लाख ८६ हजार ३९९ रुपयांचे बिल दिले आहे. ही नावे वेगवेगळी असली तरी कंत्राटदार एकच असल्याचे समजते. तसेच कार्यक्रमासाठी छापलेल्या घडीपत्रिकांसाठी शिवानी प्रिंटर्स नावाने ८ लाख ६७ हजार ५४० रुपयांचे बिल दिले आहे.  या सर्व बिलांवर निबंधक इंदिरा अस्वार यांच्या स्वाक्षऱ्या असून, महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिलेल्या मान्यतेनुसार हा व्यवहार झाला आहे.

विशेषतः कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणे, पुढील काम त्याला न देणे अशी कारवाई करण्याची पद्धत आहे, पण जेवणावळीवर लाखो रुपयांचे बिल देऊन कंत्राटदाराला पवित्र करून घेतले आहे. दरम्यान, याबाबत महसंचालक गजभिये यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही. निबंधक अस्वार यांनी मात्र थेट प्रतिक्रिया देण्यास नकार देऊन, आपणास योग्य वाटेल ते द्या, असे सांगून महासंचालक प्रमुख आहेत, तेच याबाबत सांगू शकतील असे सांगितले.

मंत्री धनंजय मुंडे लक्ष घालणार का?

वर्षभरापासून ‘बार्टी’ वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. त्यामुळे विविध योजना आणि प्रकल्पांबद्दल सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी प्रश्न उपस्थित करीत आहेत. संशोधन आणि प्रशिक्षणाचे कार्यक्रम न होता केवळ १०० कोटींच्या बजेटवर डोळा ठेवून कारभार होत असल्याची टीका होत आहे. आता सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे या प्रकरणात लक्ष घालणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेPuneपुणे