पुणे : जिल्हा व परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणीपुरवठा करणा-या भीमा खो-यातील २५ पैकी ७ धरणांत शून्य टक्के, तर १०धरणांत दहा टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे भीमा खोºयातील धरणे चांगलीच तळाला गेली आहेत. मात्र, पुणे शहर परिसराला पाणीपुरवठा करणाºया खडकवासला धरणात ४१.७१ टक्के, तर पानशेतमध्ये १८.४५ टक्के पाणीसाठा रविवारी उपलब्ध होता. त्यामुळे पुणे महापालिकेलासध्या पाण्याचा तुटवडा दिसून येत नसला तरी पाऊस लांबल्यास पुणेकरांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.राज्यातील बहुतांश सर्वच जिल्ह्यांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, विदर्भ मराठवाड्यासह, मध्य महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवनही वेगाने होत आहे. तसेच उन्हाळ्यात पाण्याचा वापर वाढल्याने धरणाची पाणीपातळी चांगलीच खालावत आहे. काही भागांत दुष्काळाची परिस्थिती भीषण झाली असून, अनेक भागांत नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.भीमा खोºयातील पिंपळगाव जोगे, वडज, डिंभे, घोड, टेमघर, नाझरे आणि उजनी धरणात शून्य टक्के पाणीसाठा असून, माणिकडोह, येडगाव, विसापूर, चासकमान, भामा-आसखेड, मुळशी, नीरा-देवघर, भाटघर, वीर या दहा धरणांत दहा टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. तर कळमोडी, पवना, कासारसाई, पानशेत आणि गुंजवणी धरणांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी आहे. त्यातच मॉन्सूनच्या महाराष्ट्रातील आगमनास वेळ लागणारअसल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविला जात आहे. त्यामुळे दुष्काळाची दाहकता चांगलीच जाणवणार आहे, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.>धरणांची पाणीसाठ्याची टक्केवारीधरण टक्केवारीपिंपळगाव जोगे ०.००माणिकडोह १.२४येडगाव ५.२०वडज ०.००डिंभे ०.००घोड ०.००विसापूर ३.७९कळमोडी १८.०९चासकमान ३.८५भामा-आसखेड ९.१२वडीवळे ३६.०६आंद्रा ४१.३७पवना २१.५८कासारसाई २०.८६मुळशी ८.९४टेमघर ०.००वरसगाव ८.९२पानशेत १८.४५खडकवासला ४१.७१गुंजवणी १३.८५नीरा देवघर २.६७भाटघर ६.१६वीर ०.५४नाझरे ०.००उजनी (उणे) ५१.३४
भीमा खोऱ्यातील धरण तळाला, सात धरणांत शून्य टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 5:21 AM