शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

साखरेला आधारभूत किंमत द्यावी

By admin | Published: October 01, 2015 12:54 AM

उसाला एफआरपीप्रमाणे बाजारभाव देण्यासाठी केंद्र सरकारने साखरेला आधारभूत किंमत द्यावी, या मागणीचा ठराव रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या

न्हावरे : उसाला एफआरपीप्रमाणे बाजारभाव देण्यासाठी केंद्र सरकारने साखरेला आधारभूत किंमत द्यावी, या मागणीचा ठराव रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.न्हावरे येथे कारखान्याची २४ वी वार्षिक सभा अध्यक्ष अशोक पवार यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब नरके, माऊली काळे, विजय मोकाशी, खासेराव घाटगे, कुंडलीक शितोळे उपस्थित होता.कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे यांनी स्वागत केले. त्यानंतर गतवर्षी दिवंगत झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पवार म्हणाले, कारखान्याची आगामी गळीत हंगामाची एफआरपी २२७७ रुपये इतकी असून, साखरेचे भाव असेच राहिल्यास ही रक्कम शासकीय अनुदानाशिवाय देणे अशक्य आहे. तरीदेखील कारखान्याच्या प्रत्येक खर्चात काटकसर करून शेतकऱ्यांच्या कष्टाला दाम मिळवून देण्याचा प्रयत्न संचालक मंडळाचा राहील. सध्याच्या काळात साखर कारखानदारी फार मोठ्या आर्थिक संकटातून मार्गक्रमण करत आहे. राज्यामध्ये एकही साखर कारखाना असा नाही की ज्याने एफआरपीसाठी कर्ज घेतले नाही.घोडगंगाने २०१३-१४ व १४-१५ या दोन्ही हंगामाची एफआरपी देण्यासाठी चाळीस कोटी रुपये कर्ज काढले आहे. सध्याच्या काळात साखर कारखानदारीसमोर असलेल्या आर्थिक अडचणी विचारात घेऊन या कर्जाचे शासनाने अनुदानात रुपांतरित करावे. एफआरपीची रक्कम देताना प्रत्येक कारखान्यास मागील हंगामाच्या साखर उताऱ्याचा निकष लावला जातो. परंतु काही कारखान्यांकडे को-जन, आसवणी प्रकल्प असले, तरी त्यांची एफआरपी साखर उताऱ्याच्या निकषामुळे सहप्रकल्प नसलेल्या कारखान्याइतकीच आहे. घोडगंगाकडे फक्त सध्या आसवणी प्रकल्पच आहे. अशा परिस्थितीत सर्व सहप्रकल्प असणाऱ्या कारखान्यांशी घोडगंगाला एफआरपी देताना आज स्पर्धा करावी लागत आहे, असे पवार म्हणाले.कारखान्याचे कार्यकारी संचालक संभाजीराव पाटील यांनी विषयपत्रिकेचे वाचन करुन सभेच्या कामकाजाला सुरुवात केली. मागील सभेचा इतिवृत्त व विषयपत्रिकेवरील पहिले तेरा विषय सभासदांनी पंधरा मिनिटांतच एकमताने मंजूर केले. देशामध्ये उत्पादित होणाऱ्या साखरेच्या २८ टक्के साखर घरगुती वापरासाठी, तर उर्वरित ७२ टक्के साखर विविध उद्योगधंद्यांसाठी वापरली जाते. शासनाने घरगुती वापरासाठीच्या साखरेसाठी ३० रुपये, तर औद्योगिक वापरासाठीच्या साखरेचा दर ५० रुपये ठरवावा, असा ठराव शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घाटगे यांनी केंद्र व राज्य सरकारवर खरमरीत टीका करत आक्रमकपणे मांडला. या ठरावाला सभासदांनी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करून हात उंचावून एकमुखी मंजुरी दिली.सी. रंगराजन समितीच्या अहवालातील शिफारशी शासनाने मान्य कराव्यात. या शेतकरी संघटनेच्या शरद गद्रे व घाटगे यांनी मांडल्या ठरावाला सभेने तत्काळ मान्यता दिली.सभेच्या कामकाजातील चर्चेत दिगंबर फराटे, विजय कोंडे, भरत चोरमले, काकासाहेब खळदकर, आंबुजी बोरकर, अशोक शितोळे आदींनी सहभाग घेतला. सभेचे सूत्रसंचालन मंगेश ढवळे यांनी, तर आभार कारखान्याचे संचालक दिलीप मोकाशी यांनी मानले. (वार्ताहर)