कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात हातावरचे पोट असणाऱ्या आमराई भागातील मजूर कामगारांवर, तसेच नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती. ही बाब लक्षात येताच बारामती नगरपरिषदेच्या नगरसेविका मयूरी शिंदे यांच्या प्रयत्नामुळे शिवभोजनाच्या माध्यमातून गरजूंना २३ एप्रिल २०२० पासून आजपर्यंत दुपारी १२ ते २ या वेळी माता रमाई भवन, आमराई येथे दररोज न चुकता २०० नागरिकांना भोजन देण्यात येत आहे. बारामती शहरातील आमराई भागात हातावरचे पोट असणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त प्रमाणात आहे. त्यांना शिवभोजनाची गरज आहे. मयूरी शिंदे यांच्या शिवभोजन मागणीची ही बाब ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिली होती. शिवभोजनाची सुरुवात झाल्यापासून आज एक वर्षापर्यंत शिवभोजन सुरू ठेवण्यासाठी मयूरी शिंदे सातत्याने प्रयत्न केले. शिवभोजन केंद्रावर त्या स्वत: लक्ष ठेवून नागरिकांना शासनाच्या नियमांचे पालन करून शिवभोजनाचे वाटप करीत आहेत.
———————————————————
सध्या कोरोना विषाणूमुळे आलेल्या संकटमय परिस्थितीमुळे लॉकडाऊन असल्याने अनेकांचा रोजगार बुडला आहे. या उद्देशाने अशा परिस्थितीमध्ये आमराई भागातील गरजू व गरीब व्यक्तीकरिता जेवणाची सोय होण्यासाठी २३ एप्रिल २०२० पासून शिवभोजनाची व्यवस्था केली आहे.
मयूरी शिंदे, नगरसेविका, बारामती नगरपरिषद
नगरसेविका मयूरी शिंदे यांच्या प्रयत्नातून सुरू असलेले शिवभोजन थाळीचा नागरिकांना लाभ मिळत आहे.
२७०५२०२१-बारामती-११