सणसर : सणसर (ता. इंदापूर) सामान्य शेतकऱ्याच्या जमिनीचा आणि इतर कायदेशीर दस्तऐवजाचा आरसा असलेले गावातील तलाठी कार्यालयातील दप्तर तपासणी प्रांत अधिकारी यांनी करावी असे आदेश, विभागीय आयुक्तांनी दिलेले असता नाही जिल्ह्यातील प्रांत अधिकारी मात्र या आदेशाच्या कार्यवाही बाबतीत मात्र उदासीन असून आयुक्तांच्या आदेशाला जिल्ह्यातील प्रांताधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविली, असे मत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या राज्य महसूल समितीचे अध्यक्ष रमेश टाकळकर यांनी व्यक्त केले.
शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे, गौण खनिज चोरी, विविध प्रकारच्या नोंदी प्रलंबित असल्याने नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या समस्येत वाढ होत असल्याची तक्रार रमेश टाकळकर यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. विभागीय आयुक्त व पुणे जिल्हाधिकारी यांनी वारंवार आदेश देऊनही जिल्ह्यातील प्रांत अधिकारी या आदेशाची अंमलबजावणी करत नसल्याने त्यांच्यावर कर्तव्यात कसूर करणे, लोक सेवकांनी शेतकरी ग्राहकाच्या लेखी तक्रारीला उत्तरे न देणे आदी मुद्द्यांवर कारवाई करावी. असे निवेदन विभागीय आयुक्तांना रमेश टाकळकर यांनी दिले आहे.