शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

बिनधास्त जा हत्यारे घेऊन!

By admin | Published: August 20, 2016 5:22 AM

उद्योगनगरीचे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे शुक्रवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनच्या

पिंपरी : उद्योगनगरीचे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे शुक्रवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून उघडकीस आणले. चाकू, सुरे अशी शस्त्रे घेऊन लोकमतचे प्रतिनिधी तळमजल्यापासून चौथ्या मजल्यापर्यंत सुमारे पाऊण तास खुलेआम वावरले. विविध विभागप्रमुखांचे विभाग, महापौर, विरोधी पक्षनेते, स्थायी समिती अध्यक्ष, उपमहापौर, पक्षनेत्यांंच्या दालनापासून आयुक्तांच्या दालनांच्या परिसरात शस्त्र घेऊन वावरणाऱ्यांना साधे कोणी हटकले नाही. यावरून महापालिकेची सुरक्षा व्यवस्था ढिसाळ असल्याचे दिसून येते. महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर होणाऱ्या आंदोलनांबाबत चर्चा झाली होती. त्या वेळी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याने महापालिकेच्या सुरक्षा यंत्रणेवर ताशेरे ओढले होते. ‘ओळख असली, तर महापालिकेत कोणालाही सोडले जाते. सर्वसामान्यांच्या संघटनांना मुख्य इमारतीत प्रवेश दिला जात नाही. इतर वजनदार राजकीय पक्षांच्या आंदोलकांना सोडलेच कसे जाते, असा प्रश्न उपस्थित केला होता. तपासणी न होताच महापालिकेत शिरणाऱ्या आंदोलकांना आवरायला हवे, नाहीतर एखाद्या दिवशी कोणी पिस्तूल, तलवारी, चाकू, सुरे घेऊन येतील, अशी शक्यता व्यक्त केली होती. महापालिकेच्या सुरक्षा यंत्रणेचा पोलखोल शुक्रवारी केला. महापालिकेची सुरक्षाव्यवस्था ढिसाळ असल्याचे लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले. शुक्रवारी सायंकाळी सव्वापाच ते सहा या वेळेत स्टिंग आॅपरेशन केले.कर्मचाऱ्यांची बघ्यांची भूमिकासायंकाळी ५.२० : पहिल्या मजल्यावरही लोकमतचे पथक गेले. त्यातील दोघे जण बाहेर सुरा काढून या मजल्यावर इकडून तिकडे फिरत होते. याच वेळी काही कर्मचारी आणि नागरिकही उभे होते. त्यांच्यापैकी कोणीही शस्त्र घेऊन वावरणारांना हटकले नाही. त्यानंतर लिफ्ट शेजारील दोघे जण हातात चाकू घेऊन जिन्याने दुसऱ्या मजल्यावर गेले. तेथून पुन्हा पहिल्या मजल्यावर आले. मागील दरवाजाच्या बाजूस असणाऱ्या लिफ्टजवळ उभे राहिले. लिफ्ट आल्यानंतर ही टीम लिफ्टने चौथ्या मजल्यावर पोहाचले. तिथे आयुक्तांच्या दालनासमोर एक पोलीस शिपाई उभा होता. तर ई-गव्हर्नन्स् विभागाच्या बाजूला काही नागरिक उभे होते. काही वेळाने आयुक्त कार्यालयासमोर असणारा पोलीस कर्मचारी पुन्हा कार्यालयातील खुर्चीवर जाऊन बसला. त्याच वेळी दोघेजण सुरे हातात घेऊन या दालनावर वावरत होते. लोकमतची टीम तिसऱ्या मजल्यावर आली. महापौर, स्थायी समिती सभापती, पक्षनेते या कार्यालयाच्या परिसरात वावरली. त्यानंतर जिन्याने खाली आले. हटकलेच नाही सुरा घेऊन जाणाऱ्यास शुक्रवारी सायंकाळी ५.१० : महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा व्यवस्था तैनात असते. आजही तेथे कर्मचारी तैनात होते. निव्वळ हातावर हात ठेवून ते उभे होते. प्रवेशद्वारावरच मेटल डिटेक्टर आणि पुढे बॅग स्कॅनिंग करण्याची व्यवस्था आहे. टीममधील एकजण खांद्यावर सॅक अडकवून मेटल डिटेक्टरच्या शेजारील मोकळ्या जागेतून आत शिरला. त्या पाठोपाठ दुसरा एक जण चाकू घेऊन प्रवेशद्वारातून आत जाऊ लागले. मेटल डिटेक्टरमधून न जाता शेजारील बाहेर जाण्यासाठीच्या मार्गातून ते आत शिरले. मागील दरवाजाही उघडासायंकाळी ५.१२ : मुख्यालयास मागील बाजूस एक दरवाजा आहे. तो सुरुवातीला बंद असल्याचे दिसले. दरवाजाजवळ जाऊन पाहिल्यानंतर त्याला कुलूप लावलेले नसल्याचे दिसून आले. तो दरवाजा उघडून शस्त्र घेऊन आणखी दोघे जण मुख्यालयातील तळमजल्यावर पोहोचले. तळमजल्यावर सुमारे पाच मिनिटे हे प्रतिनिधी चाकू, सुरे घेऊन वावरत होते. चाकू घेऊन आलेल्यांबाबत कोणालाही संशय आला नाही. काही वेळाने मुख्य प्रवेशद्वाराच्या असणाऱ्या जिन्याने हे चौघे जण पहिल्या मजल्यावर गेले.मागील दरवाजात ‘आवो जावो घर तुम्हारा’तळमजल्यावरील मागील दरवाजा, ५.३० : तळमजल्यावरील मागील दरवाजाच्या परिसरात सुमारे २० मिनिटे शस्त्रे घेऊन लोकमतचे प्रतिनिधी ये-जा करीत होते. कार्यालय सुटण्याची वेळ झाल्याने या दरवाजाने कर्मचारी बाहेर पडत होते. त्याच वेळी हातात शस्त्र घेऊन ‘लोकमत’चे प्रतिनिधींनी आत-बाहेर केले. या वेळी काही कर्मचारी टीम लोकमतच्या मागे-पुढे चालले होते. काही महिला-पुरुष कर्मचाऱ्यांनी हा प्रकार पाहिलाही. मात्र, कोणीही टीमला हटकले नाही. त्यानंतर स्टिंग आॅपरेशनच्या टीममधील सदस्य आल्या मार्गानेच महापालिका भवनातून बाहेर पडले. : संकलन : विश्वास मोरे, मंगेश पांडे, नवनाथ शिंदे. छायाचित्र : अतुल मारवाडी