राजगुरुनगर : भामा-आसखेड धरणग्रस्त शेतक-यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावर धरणग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी येत्या २१ व २२ तारखेला पाईट गावात धरणग्रस्त शेतकºयांची बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांत आयुष प्रसाद यांनी दिली.राजगुरुनगर येथील प्रांत कार्यालयात शनिवारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत भामा-आसखेड धरणग्रस्तांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला तहसीलदार सुनील जोशी, नायब तहसीलद वाजे, बी. बी. बोडके, गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार, सविता घुमटकर, भामा आसखेड धरण प्रकल्प पुनर्वसन अधिकारी, धरणग्रस्त शेतकरी उपस्थित होते.या वेळी भामा-आसखेड धरणाच्या २३ गावांतील धरणग्रस्त गावे आणि शेतकºयांनी मांडलेल्या समस्यांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. धरणातंर्गत १८ गावांच्या गावठाणाची हद्दकोष निश्चितकरणे, गावठाणातील अतिक्रमणाचे सर्वेक्षण करून हा अहवाल प्रांताधिकारी यांच्याकडे सादर करणे, भामा आसखेड धरणातील सुमारे ३०० पेक्षा जास्त आदिवासी कातकरी, बलुतेदार, मजूर आदी गावांतील नागरिकांची नावे संकलन मध्ये घेण्यात यावीत.अवार्ड १ ते ३ मध्ये संपादन झालेल्या शेतकरी खातेदारांची नावे समाविष्ट होण्यासाठी पुरवणी संकलन तयार करणे आदींबाबत या बैठकीत भामा आसखेड धरणग्रस्त शेतकºयांचे प्रश्न शेतकºयांनी अधिकाºयांच्या लक्षात आणून दिले. प्रश्न मार्गी लावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला.याबाबत सहायक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, धरणग्रस्त २३ गावांतील सर्व प्रश्न जाणून घेऊन आवश्यक ती जुनी कागदपत्रे काढून ते तपासून न्याय दिला जाईल. अधिकारी संबंधित गावात भेट देवून गावातील अतिक्रमणांची माहिती घेतील.>धरणग्रस्त शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी तालुका पातळीवर विविध प्रश्न सोडविण्यासाठी अधिकाºयांची नियुक्ती केली आहे. यासाठी पाईट गावात दि. २१ व २२ रोजी बैठक घेतली जाणार आहे. यामध्ये धरणग्रस्त शेतकºयांनी आपआपल्या लेखी अडचणी लेखी स्वरुपात कराव्यात. या सर्व कामाचा अहवाल तयार करून पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला जाणार आहे.
बैैठकांचे फेरे सुरूच; प्रश्न सुटेना!, प्रांताधिका-यांनी घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:19 AM