शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
4
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
5
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
6
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
7
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
8
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
9
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
10
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
11
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
12
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
13
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
14
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
15
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
16
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
17
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
18
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
19
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
20
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य

Bavdhan Pin Code : बावधन व परिसरासाठी नवे पिन नंबर - ४११०७१

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 10:46 IST

बावधनच्या नव्या पोस्ट ऑफिसचे लोकार्पण

पुणे : बावधन परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी बावधन परिसरात नवे पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आले. त्याचे लोकार्पण नुकतेच महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे चीफ पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग यांच्या हस्ते झाले. त्यामुळे बावधन व परिसरातील नागरिकांसाठी आता नवा पिन क्रमांक तयार झाला आहे. तो पिन ४११०७१ असा असेल.

पुणे शहरातील बावधन परिसराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला असल्याने बावधन भागातील नागरिकांना पोस्ट ऑफिसच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी दूरवरील पाषाण पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागत होते. त्यामुळे अनेक वर्षांपासून बावधनमधील नागरिकांकडून बावधन परिसरात पोस्ट ऑफिस उघडण्याची मागणी होती. या मागणीचा विचार करून नवे पोस्ट ऑफिस सुरू केले.

यावेळी पुणे विभागाचे पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये, डायरेक्टर ऑफ पोस्टल सर्व्हिसेस सिमरन कौर, पुणे शहर पश्चिम विभागाच्या प्रवर अधीक्षक रिपन डुलेट, आदी उपस्थित होते.

या कार्यालयामध्ये पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक, आधार कार्ड, स्पीड पोस्ट, रजिस्टर बुकिंग, पार्सल बुकिंग, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या सर्व सुविधा अशा पोस्टाच्या अनेक सेवांचा समावेश आहे.

उद्घाटनप्रसंगी बोलताना महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे चीफ पोस्ट मास्टर जनरल श्री अमिताभ सिंग यांनी पोस्ट ऑफिसची सेवा केवळ पत्रव्यवहार आणि पार्सल पाठविण्यापुरती मर्यादित नसून, ती जनतेला विविध सुविधांचा लाभ देणारी एक महत्त्वा्ची सेवा आहे असे सांगताना ‘डाक सेवा-जन सेवा’ या ब्रीद वाक्याचा उद्देश नागरिकांच्या जीवनात सोपेपणा आणणे, त्यांना वेळेवर आणि विश्वासार्ह सेवा पुरविणे आणि समाजाच्या विकासात सहकार्य करणे असल्याचा उल्लेख केला.या गावांना असेल नाव पिनबावधन पोस्ट ऑफिस उघडल्यामुळे आता बावधन खुर्द, बावधन बुद्रुक, तलाठी ऑफिस परिसर, मराठा मंदिर परिसर, चांदणी चौक परिसर, एन.डी.ए. रस्ता, बावधन पोलिस ठाणे, न्याती, ब्रह्मा व्हॅंटेज, राम नगर, पाटील नगर, देशमुख नगर, विज्ञान नगर, आमची कॉलनी, भुंडे वस्ती, बावधन गाव, पुराणिक अर्बिटंट, स्टारगेज, चेलराम हॉस्पिटल, शिंदे नगर, आदी परिसरांचा नवीन पिन कोड 411071 असा असणार आहे.

टॅग्स :PuneपुणेPost Officeपोस्ट ऑफिसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र