ऋतु- वसन्त, ग्रीष्म, वर्षा, शरद्, हेमन्त आणि शिशिर असे सहा ऋतु आहेत. प्रत्येक ऋतु दोन महिन्याचा असतो. चैत्र-वैशाख मध्ये वसंत, ज्येष्ठ-आषाढमध्ये ग्रीष्म, श्रावण-भाद्रपद मध्ये वर्षा, आश्विन-कार्तिक मध्ये शरद्, मार्गशीर्ष-पौष मध्ये हेमंत तथा माघ-फाल्गुन मध्ये शिशिर ऋतू असतात. सूर्याची गति , त्याचे भ्रमण या आधारावर ऋतु बदल होत असतो. या ऋतुचक्रामधे सूर्याचे स्थान महत्त्वाचे असते. उत्तरायण आणि दक्षिणायन असे आदान आणि विसर्ग काल हा आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्ग नियमानुसार आपल्या दिनचर्या मध्ये बदल करायचा असतो. आपला आहार, विहार, निद्रा आणि व्यायाम निसर्ग नियमानुसार बदलावा लागतो. ऋतुसंधी मध्ये पहिल्या आठवड्यात असलेल्या ऋतूची चर्या आणि दुसऱ्या आठवड्यात येणाऱ्या ऋतूची चर्या आचरणात आणणे आरोग्यासाठी आवश्यक असते.
वसंत ऋतूचे आगमन निसर्गामध्ये वृक्ष- वल्ली ला नवीन पालवी फुटून बहर येतो आणि झाडे नविन आणि टवटवीत दिसतात. त्यामुळे सभोवतालचे वातावरण आल्हाद दायक होते. वसंत ऋतू मध्ये आहार पचायला हलका असावा, उष्णता वाढत असल्यामळे पाणी पिण्याचे प्रमाण अधिक असले पाहिजे, त्यासाठी कलिंगड, टरबूज अशी फळे सेवन करावीत, लिंबू सरबत, कोकम सरबत घ्यावे.
विहार : उन्हाची तीव्रता वाढत असल्याने दिवसा घराबाहेर जाताना टोपी किंवा छत्री किंवा स्कार्फ चा वापर करावा. निद्रा:- दिवसा झोपू नये आणि रात्री जागरण करू नये, रात्री ५-७ तास झोप झाली पाहजे. व्यायाम: हल्का व्यायाम जसं सकाळी किंवा संध्याकाळी चालण्याचा व्यायाम आवश्य करावा. योग साधना करावी. आपल्या मनाला आनंद देणारं संगीत ऐकावं . वसंत ऋतूचर्या...
- डाॅ. कीर्ती भाटी, असोसिएट प्रोफेसर, भारती विद्यापीठ आयुर्वेद काॅलेज पुणे