लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात होती. अनेक गावे ही कोरोनामुक्त झाली होती, तर काहींनी कोरोनाला वेशीवरच रोखले होते. मात्र, ही परिस्थिती बदलत असून पुन्हा कोरोना नव्या गावात आपले पाय पसरू लागला आहे. जिल्ह्यातील १०७ गावांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या गावांत कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले असून, उद्या शुक्रवारी या गावांच्या सरपंचांशी ते संवाद साधणार आहेत.
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी सुरुवातीपासून प्रत्येक गावात उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्हा परिषद तसेच आरोग्य विभागाच्या मार्फत गावोगावी सर्वेक्षण करून कोरोनाबाधितांना शोधून त्यांचे विलगीकरण करण्यात येत होते. तसेच गामपंचायतींमार्फतही प्रतिबंधात्मक उपाय केले जात होते. यामुळे अनेक गावांनी कोरोनाला वेशीवरच राेखले होते. तर बाधित गावांनी कोरोनाला उपाययोजनांच्या साह्याने वेशीबाहेर केले होते. ग्रामीण भागात रुग्णबाधितांच्या दरातही घट झाली होती. जवळपास ७.३ टक्के हा दर होता. मात्र, हळूहळू पुन्हा नव्याने कोरोना रूग्णांचा प्रसार ग्रामीण भागात होऊ लागत आहे. यामुळे या बाधित दरातही एक टक्क्यांनी वाढ झाली असून तो ८.७४ एवढा झाला आहे. आरोग्य विभागातर्फे विशेष सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात १०७ गावांत कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याची ही माहिती पुढे आली आहे.
एकीकडे ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी कोरोना नियमावली शिथिल करण्यात आली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नागिरक घराबाहेर पडत आहे. यामुळे त्यांच्याकडून कोरोना नियमावलीचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत आहे. यामुळे रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे. भोर, जुन्नर, पुरंदर तालुक्यांतील गावांत कोरोना रूग्ण दिवसेंदिवस वाढू लागले आहे.
काेट
आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत विभागामार्फत कोरोनाच्या प्रसाराबाबत जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात १०७ गावांत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याचे आढळले आहे. यामुळे या गावांत कोरोना प्रतिबंधात्मक उपाय अजून कठोर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या संदर्भात शुक्रवारी ११ वाजता ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, या गावांच्या सरपंचांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
-आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी
रुग्णसंख्या वाढत असलेली गावे
आंबेगाव तालुका
कळंब, निरगुडसर, पेठ, मंचर, महाळुंगे पडवळ, रांजणी, वडगाव काशिंबेग, विठ्ठलवाडी
बारामती तालुका
गोजुबावी, कंबळेश्वर, कारंजे, काटेवाडी, मनाजीनगर, मोरगाव, पांढरे, सांगवी, सुपे, सावळ, सुपे, उंडवडी क.प
भोर तालुका
चिखलगाव, कामथडी, कापूरव्होळ, कारी, नसरापूर, शिंदेवाडी, देऊळगावगाडा, लिंगाळी, नानगाव, नानविज, शिरापूर, आर्वी, लोकवडी, खेड शिवापूर, तुळापूर, देहू, पिंपरी सांडस, भिवरी, शंदवने, पिंपरी कुहू, पोंधवडी, वेलवाडी, मदनवाडी.
जुन्नर तालुका
आळेफाटा, आर्वी, भटकलवाडी, धोलवड, डिंगोरे, करंजाळे, गुळुंचवाडी, कांदळी, खोडद, नारायणगाव, निमगाव सावा, ओतूर, पिंपळगाव सिद्धनाथ, पिंपळवंडी, शिरोली बुद्रुक, शिरोली खुर्द, उदापूर, उंब्रज नं. १ आणि २, वडगाव आनंद, वडज, वारुळवाडी.
खेड तालुका
आसखेड बुद्रुक, चांडोली, चास, गोनवडी, खालुंब्रे, मरकळ, म्हाळुंगे, पाईट, राक्षेवाडी, सांगुर्डी, शिरोली, वाकी बुद्रुक, येलवाडी.
मावळ तालुका
चांदखेड, गोनशेत, काले, कामशेत, लोहगड, परांडवाडी, राजपुरी, टाकवे बुद्रुक, तळेगाव दाभाडे, वराळे, येलसे.
मुळशी तालुका
बावधन, जवळ, कासारआंबोली, कासारसाई, मान, नांदे, पौड
पुरंदर तालुका
हरगुडे, माहुर,नाझरे क.प, नीरा, सटलवाडी, सिंगापूर, तक्रारवाडी, वाघापूर, कवठे यमाई, खंडाळे, पिंपरखेड.
वेल्हा तालुका
मंजाई असानी, रूळे