शहरं
Join us  
Trending Stories
1
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
2
दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
3
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
4
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
5
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
6
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
7
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
8
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
9
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
10
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
11
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
12
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान
13
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसचे 'खटाखट-खटाखट' मॉडेल फेल: अनुराग ठाकूर
14
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
15
'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..."
16
"कुठे आम्ही ६० जागा जिंकण्याच्या बाता मारत होतो आणि…’’, निकालांबाबत कुमारी शैलजा म्हणाल्या
17
जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...
18
"मल्लिकार्जुन खर्गेजी पत्ता सांगा, 'ती' जिलेबी...", भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्याचा राहुल गांधींना बोचरा टोला
19
नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार
20
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."

सावधान, डेंग्यूचा डंख वाढतोय, विषाणूजन्य आजारांची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2018 1:00 AM

पावसाळा सुरू झाला की हैराण करणारा डेंग्यू या डासापासून पसरणारा विषाणूजन्य आजार डोके वर काढू लागला आहे.

पुणे : पावसाळा सुरू झाला की हैराण करणारा डेंग्यू या डासापासून पसरणारा विषाणूजन्य आजार डोके वर काढू लागला आहे. शहरात जुलै महिन्यात डेंग्यूचे ४४५ संशयित रुग्ण आढळून आले असून, ८० जणांना लागण झाली आहे. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या तीन दिवसांतच संशयित रुग्णांची संख्या ८०च्या पुढे गेली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या दुप्पट असल्याने यंदा डेंग्यू ‘ताप’दायक ठरण्याची चिन्हे आहेत.शहर व उपनगरांमध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये डेंग्यूचे अनेक रुग्ण आढळून येतात. ‘एडिस एजिप्टाय’ हा डास चावल्याने हा आजार होतो. प्रामुख्याने साठलेल्या स्वच्छ पाण्यात या डासांची उत्पत्ती होते. हा डास चावल्याने कोणत्याही व्यक्तीला डेंग्यूचा ताप येऊ शकतो. लहान मुलांना डेंग्यू संसर्गाचा धोका अधिक असतो. शहरात जून महिन्यापासूनच पावसाला दमदार सुरुवात झाली. पावसाचा जोर जसा वाढत गेला तसा डेंग्यूचा फैलावही वाढत गेल्याची स्थिती आहे. महापालिकेच्या अहवालानुसार, जून महिन्यात डेंग्यूचे १८१ संशयित रुग्ण आढळून आले. त्यापैकी २८ जणांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जुलै महिन्यात संशयित रुग्णांचा आकडा ४४५वर पोहोचला असून, ८० जणांना लागण झाली आहे. मागील वर्षीची स्थिती पाहिल्यास जून महिन्यात ५८ तर जुलैमध्ये २२८ संशयित रुग्ण आणि अनुक्रमे ६ व ५८ जणांना लागण झाल्याचे आढळून आले होते.दोन्ही वर्षीची तुलना केल्यास यंदा डेंग्यूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येत आहे. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या तीन दिवसांत ८१ संशयित रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी ७ जणांना हा आजार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे डेंग्यूचा फैलाव दिवसेेंदिवस वाढतच चालल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दरवर्षी डेंग्यू व इतर विषाणूजन्य आजाराला आळा घालण्यासाठी औषध फवारणीसह विविध उपाययोजना केल्या जातात. पाणी साठून राहिलेली ठिकाणे शोधून किंवा तक्रारींनुसार संबंधित आस्थापनांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. यंदाही ही कारवाई सुरू आहे. पण त्यानंतरही डेंग्यूचा फैलाव वाढत असल्याने हे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे चित्र आहे.>काय काळजी घ्यावी ?घरात पाणी साठवलेली भांडी झाकून ठेवावीतआठवड्यातून एकदा घरातील पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावीतघरातील जागा जास्तीत जास्त कोरडी ठेवावीघरात, भोवताली वापरात नसणारे टाकाऊ साहित्य ठेवू नयेथोडा ताप आला तरी डॉक्टरांचा सल्ला घ्यावाअंगभर कपडे घालावेतउकळलेले पाणी प्यावे, ताजे अन्न खावेफळांचा रस यांसह द्रव पदार्थ भरपूर प्रमाणात घ्यावेत>चिकुनगुनियाही वाढतोयडेंग्यूप्रमाणेच यावर्षी चिकूनगुनियाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. रुग्णांचा आकडा कमी असला तरी वाढीचा वेग अधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसते. जून महिन्यात शहरात चिकुनगुनियाचे केवळ ६ रुग्ण आढळले होते. जुलै महिन्यात हा आकडा ५४ वर जाऊन पोहोचला. मागील वर्षी जून महिन्यात ७, तर जुलै महिन्यात या आजाराचे २८ रुग्ण आढळून आले होते.>डेंग्यूचा फैलावसाठलेल्या स्वच्छ पाण्यात डासांची पैदासघरातील कुंड्या, फ्रिजखालील ट्रे, फुलदाणी, एअर कंडिशनर, उघड्यावरील टायर, करवंट्या, गच्चीवर पाणी साठण्याच्या जागा, झाकण उघडे राहिलेल्या पाण्याच्या टाक्या यामध्ये डासांची वाढडेंग्यूचे डास प्रामुख्याने दिवसा चावतात>वर्ष महिना संशयित रुग्ण लागण२०१७ मे २८ ३जून ५८ ६जुलै २२८ ५८आॅगस्ट ७८६ २३४२०१८ मे ५१ ३जून १८१ २८जुलै ४४५ ८०दि. ३ आॅगस्टपर्यंत ८१ ७‘एडिस एजिप्टाय’ हा डास चावल्याने हा आजार होतो.साठलेल्या स्वच्छपाण्यात याडासांचीउत्पत्तीहोते.

टॅग्स :Puneपुणेdengueडेंग्यू