शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

टिंगल-टवाळी कराल तर खबरदार

By admin | Published: September 22, 2015 3:27 AM

गणेशोत्सवातील गर्दी म्हणजे टिंगलटवाळीसाठी संधी असे कोणी समजत असेल तर खबरदार...असा इशारा तरुणीच देऊ लागल्या आहेत.

पुणे : गणेशोत्सवातील गर्दी म्हणजे टिंगलटवाळीसाठी संधी असे कोणी समजत असेल तर खबरदार...असा इशारा तरुणीच देऊ लागल्या आहेत. दुर्गावतार धारण करून टिंगल करणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडवू असे त्या म्हणायला लागल्या आहेत. पुण्यातील गणेशोत्सवात राज्यातूनच नव्हे तर देशभरातून गणेशभक्त येत असतात. यामध्ये महिलांची संख्याही मोठी असते. गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवात तरुणींच्या टिंगल-टवाळीचे गालबोट लागत होते. मात्र, ‘निर्भया’ प्रकरणानंतर तरुणींमध्ये आता प्रतिकाराची जिद्द निर्माण झाली असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीमध्ये आढळून आले. आरती कोकोटे आणि तिच्याबरोबरच्या चार युवती रात्री उशिरापर्यंत गणपती पाहत होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘आम्ही प्रत्येक वर्षी गणपती बघण्यासाठी येतो. अनेकदा आम्हाला वाईट अनुभव यायचे. काही टवाळ मुले गर्दीचा फायदा घेऊन अंगाला हात लावतात. नेमके कोणी हे कृत्य केले हे गर्दीमुळे समजायचे नाही. घरच्यांना सांगितले की तेही ओरडत. पुढील वर्षी गणपती पाहण्यास जायचे नाही असेही सांगितले जाते. परंतु आता आम्ही प्रतिकार करायला शिकलो आहे. कोणी छेडछाड काढली तर आम्ही त्या मुलांना थेट शिव्या देतो. त्यामुळे आसपासचे लोकही लगेच त्या मुलांकडे बघत असत. कल्याणीनगरच्या बीपीओमध्ये काम करणाऱ्या पाच तरुणींचा ग्रुप रात्री ड्युटी संपल्यावर गणपती पाहण्यासाठी आला होता. त्या म्हणाल्या, ‘‘कोणी छेड काढताना दिसला तर आम्ही थेट त्याला उत्तर देतो. पुण्याचे नागरिक संवेदनशील आहेत. मुलींबाबत काही घडत असेल तर ते थांबतातच, असा आमचा अनुभव आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत थांबण्यास भीती वाटत नाही.’’पोलिसांकडून छेडछाडीच्या प्रकाराबाबत कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय हे पाहण्यासाठी ‘लोकमत’च्या प्रतिनिधी काही भीतीदायक अवस्थेत बेलबाग चौकात पोहोचल्या. पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यास मंडपात बसलेल्या दोन महिला पोलीस अधिकाऱ्यांशी बोलायचे आहे म्हणून पुढे गेल्या. तेथे दोन पोलीस कॉन्स्टेबल गप्पा मारत उभे होते व त्यांच्या शेजारी एक पोलीस मित्र उभा होता. पोलिसांनी लक्ष दिले नाही मात्र, पोलीस मित्राने पुढे सरसावून काय झाले आहे अशी विचारपूस केली. मंडई चौकापासून काही टवाळखोर मुले आमचा पाठलाग करीत आहेत व काही अश्लील कॉमेंट पास करीत आहेत, असे सांगत असताना देखील शेजारी उभ्या असलेल्या महिला कॉन्स्टेबलने साधी विचारपूसदेखील केली नाही. पोलीस मित्रानेच प्रतिनिधींना धीर दिला. ती मुले तुम्हाला आजूबाजूला आता कुठे दिसत आहेत का, तुम्ही त्यांना ओळखू शकता का, ती मुले दिसताच आम्हाला फक्त इशाऱ्याने कळवा, आम्ही त्या मुलांचा बंदोबस्त करूव वेळ पडलीच तर आम्ही तुम्हाला घरी पोहोचवण्याचीदेखील व्यवस्था करू. त्या पोलीस मित्राने सांगितल्याप्रमाणे प्रतिनिधी समोरील चौकात १० ते १५ मिनिटे उभ्या राहिल्या. काही वेळाने त्याच ठिकाणी एक महिला कॉन्स्टेबल आली व प्रतिनिधींशी अरेरावी भाषेत संवाद साधण्यास तिने सुरुवात केली.