शनिवारी दुपारी ३.३०च्या सुमारास शैलेश कुरी हे मुंबईहून हिंगोलीला जाण्यासाठी येथील नगर मोरी चौकामध्ये बसची वाट पाहत होते. त्या वेळी एकाने त्यांना चल तुला एसटी स्टॅंडवर सोडतो असे सांगून आपल्या दुचाकीवर बसविले. गिरीम हद्दीतील वायरलेस फाटा परिसरात नेले. त्या ठिकाणी आधीच उभ्या असलेल्या तीन जणांनी मिळून शेलेश यांना मारहाण केली. त्यांच्याकडील ३५ हजार रुपये रोख तसेच ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा ४० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणातील आरोपींचा शोध चालू असताना रविवार (दि. २५ ) रोजी पोलीस कर्मचारी अमीर शेख, विशाल जावळे, आदेश राऊत, जब्बार सय्यद, अमजद शेख यांच्या पथकाने एका संशयितास ताब्यात घेतले. हा अट्टल गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शेतमजुरास मारहाण करून लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 4:10 AM