सदरील उपक्रमानंतर आदर्श शिक्षक महादेव नेहेरे गुरुजी यांच्या हस्ते देवस्थानाच्या प्रवेशक्षेत्र परिसरात ५१ वृक्षरोपांची लागवड करून स्वागत फलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण कोरडे, वरची भांबुरवाडीचे सरपंच विजय थिगळे, ग्रामपंचायत सदस्य किशोर रोडे, शुभम ढोरे, प्रवीण भांबुरे, सोपान कोरडे, दिनेश कोरडे आदी उपस्थित होते.
पुण्यात माहिती तंत्रज्ञान तसेच सेवा क्षेत्रात कार्यरत असलेले काही तरुण संघटितपणे अध्यात्मिक वसा जपत गेली सहा वर्षे समीतीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सेवाभावी संकल्पनेतून श्री तुकाईमाता देवस्थान प्रवेशक्षेत्राचे भक्तिभावे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या वेळी आदर्श शिक्षक नेहेरे, विजय भांबुरे उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : ३०शेलपिंपळगाव वृक्षारोपण
फोटो ओळ : तुकाईवाडी (ता. खेड) येथे वृक्षारोपण करताना उपक्रमार्थी.
===Photopath===
300621\30pun_7_30062021_6.jpg
===Caption===
फोटो क्रमांक : ३०शेलपिंपळगाव वृक्षारोपणफोटो ओळ : तुकाईवाडी (ता. खेड) येथे वृक्षारोपण करताना उपक्रमार्थी