मानाच्या पाचही गणरायांचे थाटात विसर्जन : पावणे आठ तासांत मिरवणूक पार पडलीपुणे : गणरायाच्या नामघोष, मंत्रोच्चार, ढोल ताशांच्या गजर आणि श्रीं च्या विसर्जन मिरवणुकीच्या रथाची आकर्षक सजावट यांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. सकाळी साडेदहाच्या सुमारास सुरू झालेल्या मानाच्या पाच गणपतींच्या मिरवणुकीची सांगता पावणे सात वाजता झाली. विशेष म्हणजे मागील वर्षीसारखीच यंदा देखील मिरवणूक पार पडण्यास पावणे आठ तासांचा वेळ लागला. मंडईतील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापासून मानाच्या पाचही गणपतीच्या मिरवणुकांना सुरुवात झाली. शहराचे ग्रामदैवत व मानाचा पहिला कसबा गणपतीचे मांडवात सव्वा दहा वाजता आगमन झाले. त्यापुर्वी त्यांच्या नगारखान्याचे आगमन झाले. यानंतर महापौर मुक्ता टिळक, पोलीस आयुक्त,पालकमंत्री गिरीश बापट, उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे, खासदार अनिल शिरोळे, माजी आमदार उल्हास पवार, भाजपचे पदाधिकारी संदीप खर्डेकर आदी मान्यवरांसह मंडळाचे पदाधिकारी व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणरायाच्या जयघोषाने दुमदुमून निघालेल्या गणेशोत्सवाची सांगता रविवारी झाली. चांदीच्या पालखीत मानाचा पहिला कसबा गणपती विराजमान झाला होता. या गणपतीचे आगमन विसर्जन मार्गावर होता क्षणी भाविकांनी गणपती बाप्पा मोरयाचा गजर केला. यावेळी या गणपतीचे दर्शन घेण्याकरिता भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाली. मिरवणूकीमध्ये देवळणकर आणि गायकवाड यांचे सनई चौघडा वादन केले. याबरोबरच होणार आहे.बँक आॅफ महाराष्ट्र आणि आर्ट आॅफ लिव्हींगच्या पथकाने सामाजिक प्रबोधन करणारे हाती फलक धरून जनजागृतीकरिता केली. अलका चौकात कसबा गणपती 3 वाजता दाखल झाला. त्यानंतर पुढे तो विसर्जनाकरिता मार्गस्थ झाला. तांबडी जोगेश्वरीच्या श्री च्या पालखीच्या आकर्षक सजावटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चांदीच्या त्या पालखीची रंगीबेरंगी फुलांची आरास गणेशभक्तांच्या कौतुकाचा विषय ठरली. मिरवणूक रथासमोर सतीश आढाव यांचे नगारावादन झाले. बाळासाहेब आढाव यांच्या न्यु गंधर्व ब्रास बँण्डने रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या गणेश भक्तांना ठेका धरण्यास भाग पाडले. याशिवाय महिलांच्या अश्वपथकाने मिरवणूकीची शोभा वाढवली. यावेळी रोटरी क्लबच्या सदस्यांनी सामाजिक संदेश देणारे फलक हाती घेतले होते. मानाचा या दुसºया गणपतीचे अलका चौकात आगमन झाले. गुरुजी तालीम मंडळाच्या श्री च्या विसर्जनाच्या रथाची सुंदर सजावट करण्यात आली होती. आकर्षक रंगाच्या फुलांची कलात्मक मांडणी करून मिरवणुक रथाची शोभा वाढवली. ढोलपथकांचे शिस्तबद्ध संचलन, जोडीला मोरयाचा गजर करीत मानाचा हा तिसरा गणपती अलका चौकात दाखल झाला. गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीत जयंत नगरकर यांचे नगारावादन झाले. मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीने यावर्षी विसर्जन मिरवणुकीकरिता शेषात्मक गणेशाचा देखावा तयार केला. विपुल खटावकर आणि राजेंद्र पाटील यांच्या सजावटीतुन आकारास आलेल्या आकर्षक सजावतीने उत्सवात रंग भरला. शेष नागावर आरूढ असलेली गणेशाची भव्य मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तुळशीबाग श्रीं ची मिरवणूक अलका चौकात पावणेसहा वाजता दाखल झाली. केसरीवाड्यातील गणेशोत्सवाला यंदा १२५ वर्ष पूर्ण झाल्याने मंडळाच्या वतीने लोकमान्य टिळक यांच्या स्वराज्याच्या कार्यात्मक आठवणींना उजाळा देण्यात आला. ध्वनिचित्रफितीव्दारे लोकमान्यांचे विचार यावेळी गणेशभक्तांपर्यत पोहचविण्यात आले. यावेळी टिळकांचा साडेनऊ फुट उंचीचा पुतळा रथात ठेवन्यात आला होता. साडेसहाच्या सुमारास केसरीवाड्याच्या श्रीं चे अलका चौकात आगमन झाले. नटेश्वर घाटावर मानाच्या या पाचही गणरायांचे विसर्जन हौदात करण्यात आले.
पुण्यक्षेत्री रंगला मानाच्या गणेशोत्सवाचा नयनरम्य सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 7:23 PM
गणरायाच्या नामघोष, मंत्रोच्चार, ढोल ताशांच्या गजर आणि श्रीं च्या विसर्जन मिरवणुकीच्या रथाची आकर्षक सजावट यांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला.
ठळक मुद्देमानाच्या पाचही गणरायांचे थाटात विसर्जन : पावणे आठ तासांत मिरवणूक पार पडलीमंडईतील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापासून मानाच्या पाचही गणपतीच्या मिरवणुकांना सुरुवातनटेश्वर घाटावर मानाच्या या पाचही गणरायांचे विसर्जन हौदात