पुणे : अंगठ्याच्या नखावर बोटांनी हळुवार रंगभरण करीत तांदळाच्या आकारात काश्मीरचे सौंदर्य कॅनव्हासवर उतरविण्याचा विक्रम सोपान खंडागळे या अवलिया चित्रकाराने केला आहे. त्याच्या या विक्रमाची नोंद सर्वात लहान चित्र म्हणून भारत बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक केंद्रातील राजा रवी वर्मा कलादालनात जयहिंद परिवार आणि लाईफस्टार ग्लोबल रिसर्च फाउंडेशतर्फे आयोजित कलाकार राष्ट्रीय संमेलनात सोपान खंडागळे यांनी प्रात्यक्षिक केले. त्यांच्या विक्रमाची नोंद करण्यात आली. कलाक्षेत्रातील मुकेश कणेरी यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जयहिंद परिवाराचे नारायण फड उपस्थित होते. सोपान खंडागळे म्हणाले, ज्येष्ठ कलाकार इफ्तिकार अहमद राजा यांचे ८-१० वर्षांपूर्वी मी चित्र पाहिले होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेत मी हा फिंगरआर्ट कलेचा छंद जोपासला आहे. जागतिक विक्रम करणे हे माझे स्वप्न होते. ते आता पूर्ण झाले आहे. यातूनच आता उपजीविकेचा मार्ग शोधणार आहे. आतापर्यंत बेटी बचाव, स्वच्छता अभियान आदी संकल्पनांवर चित्रे रेखाटली आहेत. फिंगरप्रिंट आर्टमधून चित्र काढणारे खंडागळे यांनी तांदळाच्या दाण्याएवढे पेंटिंग काढले. त्यांच्या पेंटिंगची संकल्पना काश्मीरचे निसर्गसौंदर्य ही होती. सोपान खंडागळे बुलडाण्यातील नांदुरा तालुक्यातल्या निमगावचे असून, नोकरीनिमित्त ते सध्या सुरतमध्ये स्थायिक आहेत. पेंटिंग करणे त्यांचा आवडता छंद असून, त्यांनी तो जिद्दीने जपला आहे.
तांदळाच्या आकारात साकारले काश्मीरचे सौंदर्य; विक्रमाची नोंद भारत बुक आॅफ वर्ल्ड मध्ये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:56 AM
तांदळाच्या आकारात काश्मीरचे सौंदर्य कॅनव्हासवर उतरविण्याचा विक्रम सोपान खंडागळे या अवलिया चित्रकाराने केला आहे. याची नोंद भारत बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
ठळक मुद्देकलाक्षेत्रातील मुकेश कणेरी यांच्या हस्ते सोपान खंडागळे यांचा सन्मानसोपान बुलडाण्यातील निमगावचे असून, नोकरीनिमित्त सध्या सुरतमध्ये स्थायिकआतापर्यंत बेटी बचाव, स्वच्छता अभियान आदी संकल्पनांवर रेखाटली चित्रे