निगडी : चलनातून रद्द झालेल्या नोटा जमा करतेवेळी पोस्टाकडून शंभराच्या नोटा उपलब्ध न झाल्याने ग्राहकांना दोन हजारांच्या नोटा वाटप केल्या. या वेळी ग्राहकांनी दोन हजारांच्या नोटा नको, शंभराच्या नोटा देण्याची मागणी केली. मात्र, तरीदेखील पोस्टातर्फे शंभराच्या नोटा उपलब्ध न झाल्यामुळे ग्राहकांना हजारांच्याच नोटा वाटप केल्या. गेल्या आठवडाभरापासून निगडी पोस्टात जुन्या नोटा बदलण्यासाठी ग्राहक सकाळपासूनच रांगा लावत आहेत. बुधवारीदेखील ग्राहकांनी सकाळपासून रांगेत उभे होते. पोस्ट उघडताच जुन्या हजार-पाचशेच्या नोटा घेऊन, दोन हजारांची नोट ग्राहकांना परत करत होते. मात्र, ग्राहकांनी दोन हजारांची नोट घेऊन सुटे पैसे कुठून करणार, आम्हाला दोन हजारांची नोट देऊ नका, शंभराच्या सुट्या नोटा देण्याची मागणी केली. या वेळी पोस्ट कर्मचाऱ्यांनी आज शंभराच्या नोट उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे तुम्हाला दोन हजारांच्या नोटच घ्यावी लागेल, अशी विनंती ग्राहकांना केली.या वेळी काही ग्राहकांनी शंभराच्या नोटा मिळण्यासाठी थेट सब पोस्ट मास्तर शिवाजी नाईकरे यांच्याकडे तक्रार केली. नाईकरे यांनीदेखील ग्राहकांना शंभराच्या नोटांची जनरल पोस्ट कार्यालयाकडे मागणी केली होती. मात्र, त्यांच्याकडेही पैसे उपलब्ध न झाल्यामुळे त्यांनी शंभराच्या नोटा पाठविल्या नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी दोन हजारांच्याच नोटा घ्याव्या लागतील, असे सांगितले. दरम्यान, बुधवारी जनरल पोस्ट कार्यालयाकडून दोन हजारांच्या नवीन पाच लाखांच्या नोटा उपलब्ध झाल्या. ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने अवघ्या दोन तासांतच ही रक्कम वाटप झाल्याचे नाईकरे यांनी सांगितले. (वार्ताहर)
शंभरच्या नोटा नसल्याने हाल
By admin | Published: November 17, 2016 3:09 AM