बारामती : उंडवडी कडेपठार येथे कार्य हीच ओळख फाउंडेशनच्या माध्यमातून ‘हरित वृक्ष बन’ साकारण्यात येणार आहे. या माध्यमातून विविध प्रकारची ५०० स्वदेशी वृक्ष लावण्यात येणार आहेत. या उपक्रमाला बुधवारी (दि.१४) रोजी १५० रोपे लावून सुरुवात करण्यात आली.
पहिल्या टप्प्यामध्ये जांभळे ४०, कडुनिंब १०, पिंपळ ४०, चिंच १०, आंबा १०, करंज ४० अशी ५-६ फूट उंची असणारे १५० वृक्ष लावण्याच आले. उंडवडी कडेपठार ग्रामपंचायतीचे विशेष सहकार्य मिळाले. ग्रामपंचायत हद्दीतील गायरान गट नं-१७० मधील स्मशानभूमी व आसपासच्या परिसरात वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. फाउंडेशनच्या माध्यमातूनच वृक्षांचे संगोपन करण्यात येणार आहे. कदंब, आपटा, काटेसावर, पांगारा, बेल, निरगुडी, वड, पिंपळ, भोकर, बहावा, उंबर, कडुलिंब, भेंडी, जांभळ, करंज, आवळा, विलायती चिंच, बकूळ, देसी बाभुळ, चंदन, चिंच, आंबा, सीताफळ, रामफळ, कांचन, कवठ, बोर, टेंभुर्णी, बाभूळ, नांद्रुक, गुळवेल, खैर, अंजीर, चिक्कू, अर्जुन अशी इतर ६० हून अधिक प्रकारची देशी झाडे लावण्यात येणार आहेत.
या भागातील जैवविविधता वाढवण्यासाठी, उंडवडीसारख्या दुष्काळी भागात हे हरित बन येणा-या काळात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष समीर बनकर यांनी सांगितले. वृक्षारोपणाच्या वेळी उंडवडी कडेपठारचे सरपंच भरत बनकर, ग्रामसेवक तानाजी घोळवे, उपसरपंच भूषण जराड, सदस्य कल्याणी साळुंके, संदीप आढाव, सागर जाधव, सिद्धार्थ पाटील, महेश देशमुख, संदीप जाधव, निखिल ढमे, राहुल ढमे, विनय बनकर, हृषीकेश जाधव, प्रतीक जगतात, सौरभ बनकर, दादा वाघमोडे, तन्मय बनकर उपस्थित होते.
फोटो ओळी : उंडवडी कडेपठार येथे कार्य हीच ओळख फाउंडेशनच्या माध्यमातून हरित वृक्ष बन साकारण्यात येणार आहे.
१५०७२०२१-बारामती-०३