पुणे : योग ही आपली प्राचीन काळापासूनची संस्कृती आहे. संपूर्ण शरीराचा यामध्ये व्यायाम होतो. त्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. कोरोना काळात तर योगाचे महत्त्व आणखीच वाढले आहे. योग केल्याने मन प्रसन्न आणि शरीरात उत्साह निर्माण होतो. त्यामुळे सध्या ऑनलाइन योग करण्यावर भर दिला जात आहे. आरोग्य चांगले असेल तरच चांगले जीवन जगता येते, हेच कोरोनामुळे सर्वांना समजले आहे.
दरवर्षी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त सर्वसामान्य नागरिक घरच्या घरी योग करू शकतील, अशी आसने आम्ही देत आहोत. योग शिक्षिका सुषमा वाकडे यांनी या आसनांची माहिती दिली आहे. योगशास्त्रानुसार शरीर शुद्ध करण्याच्या प्रक्रियेसाठी शरीर ज्या विविध स्थितींमध्ये ठेवले जाते, त्यांना ‘योगासने’ म्हणतात. काही साधी, सोपी आसने आम्ही देत आहोत. जेणेकरून वाचकांना त्याचा लाभ घेता येईल. पण योगाचे शास्त्रशुध्द ज्ञान घेण्यासाठी योग प्रशिक्षकांकडून घ्यावे, असे आवाहनही वाकडे यांनी केले आहे.