भोर : हिर्डोशी (ता. भोर) येथे गणेश विसर्जनावेळी आरती करताना अचानक मधमाशांनी ग्रामस्थांवर हल्ला केला. त्यात १५० पेक्षा अधिक जणांना मधमाशांनी चावा घेतल्याचे तोंड,डोके,डोळे,हात पाय सुजले असुन यात महिला पुरुष व लहान मुलांचा समावेश आहे. सर्व जणांवर हिर्डोशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.
हिर्डोशी येथील सोमजाईवस्ती, हरळीचा माळ आणी टाकीचा माळ येथील नागरिक काल सायंकाळी साडेतीन वाजता स्मशानभूमीशेजारी असलेल्या नीरा देवघर धरणाच्या पाण्यात गणपती विसर्जन केले जाते. त्याच ठिकाणी काल विसर्जन मिरवणूक पोहोचली. गणपती व गौरी विसर्जनापुर्वी आरती सुरु असताना अचानक मधमाशा आल्या व आरती चालु असतानाच ग्रामस्थांवर मधमाशांनी हल्ला केला. यामुळे विसर्जनासाठी आलेली लहान मुले, युवक, महिला, पुरुष असे १५० पेक्षा अधिक उपस्थित होते. त्या प्रत्येकाला मधमाशांनी चावा घेतला. त्यामुळे सर्वजण वाट मिळेल तिकडे सैरवैर पळु लागले.
दरम्यान काही तासाने मधमाशाचा थवा गेल्यावर स्थानिक ग्रामस्थ धोंडिबा मालुसरे, बबन मालुसरे, बबन राजीवडे, अरुण मालुसरे, लक्ष्मण धामुनसे, संतोष मालुसरे, अंकुश धामनसे आदी ग्रामस्थांनी टाकीचा माळ, हरळीचा माळ व सोमजाईवस्ती येथील नागरिकांच्या गणेश व गौरी विसर्जन एकञीत केले. प्राथमिक आरोग्य केंद्रात मधमाशांनी चावा घेतलेल्या नागरिकांना इंजेक्शन गोळया औषधे देऊन उपचार करण्यात आले आहे. हिर्डोशी येथील आरोग्य केंद्रात वैदयकिय अधिकारी पदे रिक्त असल्याने काल सदर नागरिकांवर प्रथमोपचार करता आले नाहीत. माञ आज डॉ सौ दरेकर यांनी येथील नागरिकांवर उपचार करुन औषधोपचार केले.