पुणे : वर्षापासून कोरोनासंकटामुळे राज्यातील दिव्यांग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. लॉकडाऊनमुळे सर्व बंद असल्याने घरातच बसावे लागत आहे. रोजगार गेला, उद्योग-धंदे बुडाल्यामुळे अनेक दिव्यांगांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. इतरही मूलभूत सुविधा मिळवणे अडचणीचे होत आहे. त्यामुळे शासनाने विशेष आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी करत प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेने दिव्यांग कार्यालयासमोर गुरुवारी भीक मांगो आंदोलन करत लक्ष वेधले.
सरकारने लॉकडाऊनच्या काळात कामगार, मजूर, रिक्षावाले, पथारीवाले व इतर वर्गांसाठी विशेष मदत जाहीर केली. परंतु, ज्यांना दोन हात, दोन पाय, दोन डोळे नाही मतिमंद, अतितीव्र अशा दिव्यांग प्रवर्गासाठी सरकारने कुठलीच मदत दिलेली नाही. त्यामुळे सरकारने अडचणीत सापडलेल्या लाखो दिव्यांग व्यक्तींच्या मदतीसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करून दिव्यांगांना मदत करावी, यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिव्यांगांच्या मदतीसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, यासाठी भीक मांगो आंदोलन केले.
प्रहार अपंग क्रांती संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव, कार्याध्यक्ष दत्ताभाऊ मिरगणे, सुप्रिया लोखंडे, बापू कोकरे, रघुनाथ तिखे, अविनाश रामगुडे, युवराज नवले उपस्थित होते.
--------------------------
फोटो ओळ : महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी सरकारने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे या मागणीसाठी दिव्यांग कार्यालयासमोर प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने भीक मांगो आंदोलन करण्यात आले.