पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०१७ मध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कल चाचणीस बुधवारपासून (दि.१५)सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी राज्यातील २ हजार ३९० शाळांमधील ४० हजार १६० विद्यार्थ्यांनी कलचाचणी पूर्ण केली.राज्य मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे. तसेच दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना करियर करण्यासाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत, याबाबत कलचाचणीमुळे माहिती प्राप्त होते. त्यामुळे राज्य मंडळातर्फे गेल्या शैक्षणिक वर्षापासून सर्व विद्यार्थ्यांची कलचाचणी घेतली जात आहे. बुधवारपासून घेण्यात आलेल्या कलचाचणीत १४० प्रश्नांचा समावेश होता. विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवण्यासाठी एका तासाचा कालावधी देण्यात आला होता. या चाचणीद्वारे विद्यार्थ्यांचा कला, ललित कला, तांत्रिक, वैद्यकीय, वाणिज्य, शेतकी व संरक्षण शाखांतील कल तपासला जाणार आहे.
दहावीच्या कलचाचणीला सुरुवात
By admin | Published: February 16, 2017 3:40 AM