भोर तालुक्यात पश्चिम व पूर्व अस दोन भाग पडत असून, पश्चिम भागात नीरा-देवघर धरण भागातील हिर्डोशी खोरे, तर भाटघर धरण भागातील भूतोंडे व वेळवंड खोऱ्यात महुडे, खोरे, आंबवडे, खोरे भागात दर वर्षी वळवाचे पाऊस झाल्यावर धूळवाफेवर भात पिकाची पेरणी करतात. सध्या पावसामुळे भाताच्या बियाणांची उगवण चांगली झाली. त्यामुळे पश्चिम पट्ट्यातील नीरादेवघर धरण भागातील हिर्डोशी खोऱ्यातील शेतकरी भाताच्या लागवडीला सुरुवात केली आहे.शेतकरी कामात व्यस्त असून कामाला मजूर मिळत नाहीत.
दरम्यान, पूर्व भागातील पुणे-सातारा महामार्गावरील आजू
बाजूची गावे, भोंगवली भागातील गावे,वीसगाव खोरे भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावर जमिनीला चांगला वाफसा आल्यावरच भाताच्या बियाणांची पेरणी केली जाते.पूर्व भागात
भातापेक्षा बागायती पिके आधिक प्रमाणात घेतली जातात यात ऊस,भाजीपाला पिकांचा समावेश आहे.
भोर तालुक्यात खरीप पिकाखालील क्षेत्र २० हजार हेक्टर असून भात हे प्रमुख पीक असून सुमारे ७४०० हेक्टरवर भाताची लागवड केली जाते.५० हेक्टवर भाताच्या रोपांची पेरणी केली होती भात हे प्रमुख पीक असून यात हळव्या आणी गरव्या जातीच्या भाताची लागवड केली जात असून गरव्या जातीत इंद्रायणी,बासमती आंबेमोहर,पुसा बासमती तामसाळ,हळवेबारीक या जाती तर हळव्या जातीत रत्नागिरी २४,कर्जत १८४,सोनम इंडम फुले राधा या जातीच्या भाताची लागवड केली जाते.हळव्या जातीचे भात पीक ९० ते १०० दिवसांत तयार होते आणि त्याला पाणी कमी लागते.तर गरव्या जातीचा भात १०० ते १२० दिवसांत तयार होतो, त्याला पाणी अधिक प्रमाणात लागते तालुक्यात इंद्रायणी जातीच्या तांदळाला सर्वाधिक मागणी असून भोर तालुक्यात ८० ते ९० टक्के इंद्रायणी भाताचीच सर्वाधिक लागवड केली जाते.
पूर्व भागात आधुनिक पद्धतीने गादी वाफ्यावर भाताची रोपवाटिका तयार करून यंत्राच्या सहाय्याने भाताची लागवड केली जाते
भोर तालुक्याच्या पश्चिम भागात पारंपरिक पद्धतीने भाताचे तरवे पेरले जातात आणि मजुरांच्या मदतीनेच भाताची लागवड करतात. याला मजूर अधिक लागतात खर्चही जास्त होतो, त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानचा वापर करून आधुनिक पद्धतीने गादी वाफ्यावर भाताच्या बियाणाची रोपवाटिका तयार करून त्यानंतर यंत्राचा वापर करून यांत्रिक पद्धतीने भाताची लागवड केली जाते. यामुळे कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळत असल्याचे प्रगतिशिल शेतकरी भोर पंचायत समितीचे उपसभापती लहूनाना शेलार यांनी सांगितले.
भोर तालुक्यातील हिर्डोशी खोऱ्यात भाताच्या लागवडीला सुरवात फोटो