शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

डी.एडच्या पहिल्या प्रवेश फेरीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 4:29 AM

पुणे : राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे राबविल्या जात असलेल्या डी. एड. अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रवेश फेरीला बुधवारी सुरुवात ...

पुणे : राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे राबविल्या जात असलेल्या डी. एड. अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रवेश फेरीला बुधवारी सुरुवात झाली. डी. एड. अभ्यासक्रमाच्या उपलब्ध जागांपेक्षा प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने यंदाही सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. तसेच येत्या १५ डिसेंबरपासून महाविद्यालये सुरू होणार आहेत.

डी. एड., बी. एड. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगार उपलब्ध होत नाही. त्यातच लाखो विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला असून प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी घेतली जाणारी टीईटी परीक्षा दिली आहे. मात्र, राज्य शासनाकडून शिक्षक भरती नियमितपणे केली जात नाही. परिणामी गेल्या काही वर्षांपासून डी. एड. अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी २१ हजार १६१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. तर, २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात केवळ १२ हजार ४७९ विद्यार्थ्यांनी अर्ज केला. त्यामुळे मागील वर्षापेक्षा यंदा डी. एड.ला अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८ हजार ६८२ ने घटली आहे.

राज्यात डी. एड. अभ्यासक्रमाची ६५४ महाविद्यालये असून त्यांची प्रवेश क्षमता ३५ हजार ८१४ एवढी आहे. त्यात शासकीय कोट्याच्या २३ हजार ६०५ तर व्यवस्थापन कोट्याच्या १२ हजार जागा आहेत. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले. प्राप्त अर्जांची छाननी करून प्राथमिक गुणवत्ता यादी ३० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली तर, अंतिम गुणवत्ता यादी १ डिसेंबर रोजी प्रसिद्ध झाली. पहिल्या गुणवत्ता यादीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना येत्या ५ डिसेंबरपर्यंत संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येणार आहे. तर प्रवेशाची दुसरी फेरी ७ ते १२ डिसेंबर या कालावधीत तर तिसरी फेरी १२ ते १६ डिसेंबर या कालावधीत राबविली जाणार आहे.