यवत ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोग निधीतून दफनभूमीमध्ये पेव्हर ब्लॉक व पाण्याची टाकी बांधण्यासाठी सुमारे तीन लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. भूमिपूजन कार्यक्रमास मुस्लीम समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते मुबारक शेख, ग्रामपंचायत सदस्य इम्रान तांबोळी, तालुका दक्षता समिती सदस्य अल्ताफ शेख, दौंड तालुका काँग्रेस आय अल्पसंख्याक आघाडीचे उपाध्यक्ष मोसीन तांबोळी, दौंड तालुका काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अरविंद दोरगे, युवा कार्यकर्ते अब्रार शेख, फैय्याज तांबोळी, जावेद बेग, आरिफ तांबोळी, मुदस्सर तांबोळी, ताहीर शेख, अय्यूब मोगल, ताज अन्सारी व इतर मुस्लीम समाजातील युवक उपस्थित होते.
इम्रान तांबोळी म्हणाले, दफनभूमीतील उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी तसेच मुस्लीम समाजातील लग्न कार्यासाठी सभागृह बांधण्यासाठी आमदार राहुल कुल व सरपंच समीर दोरगे यांच्याकडे पाठपुरावा करून आवश्यक निधी उपलब्ध करून घेणार असल्याचे सांगितले.
१० यवत
पेव्हिंग ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करताना सुभाष यादव, अनमुद्दीन तांबोळी, मुबारक शेख, इम्रान तांबोळी.