चासकमान : खेडसह शिरूर तालुक्याचे नंदनवन ठरलेल्या चासकमान धरणात ४५.९७ टक्के म्हणजेच केवळ ४.४४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून शुक्रवारी धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले. सकाळी ६ वाजल्यापासून ५५० क्युसेक वेगाने पाणी विसर्ग सोडण्यात येत आहे.चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात आलेले रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन तब्बल ५७ दिवसांनंतर म्हणजेच २८ डिसेंबरला शुक्रवारी दुपारी ३ वाजता बंद करण्यात आले होते. तेव्हा चासकमान धरणामध्ये ४४.१२ टक्के म्हणजे ४.३० टीएमसी व उपयुक्त साठा व ३.३४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला होता. मागील वर्षी याच तारखेला ७.४४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता.धरणामधून खरीप हंगामाचे पहिले आवर्तन १६ जुलैला सोडण्यात आाले होते. परंतु परतीच्या पावसाने दडी मारल्याने खेडसह शिरूर तालुक्याच्या शेतकºयांबरोबरच नागरिकांच्या पिण्याच्या मागणीनुसार ते सुरू ठेवण्यात आले होते. सोडण्यात आलेले खरीप हंगामाच्या पहिल्या आवर्तनाची गरज पूर्ण झाल्याने तब्बल ८९ दिवसांनंतर म्हणजेच १२ आॅक्टोबरला संध्याकाळी ६ वाजता पहिले आवर्तन बंद करण्यात आले होते. परंतु शिरूर तालुक्यातील शेतकºयांच्या मागणीनुसार पुन्हा २ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता कालव्याद्वारे आवर्तन सोडण्यात आले होते. परंतु धरणाअंतर्गत पाणीटंचाई निर्माण होऊन भविष्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार असल्याने २८ डिसेंबरला शुक्रवारी सोडण्यात आलेले आवर्तन बंद करण्यात आले होते.धरणामध्ये ४५.९७ टक्के पाणीसाठा शिल्लकचासकमान धरणामधून रब्बी हंगामाचे तिसरे आवर्तन सोडण्यात आल्यामुळे रब्बी आवर्तनाचा शेतकºयांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आपल्या शेतात मेथी, कोथिंबीर, फ्लॉवर, कोबी, मिरची, बाजरी, ज्वारी आदींसह तरकारी पिकांना फायदा होऊन पिकांचे उत्पादन वाढून मोठ्या प्रमाणात पिकांना फायदा होणार आहे. सध्या धरणामध्ये ४५.९७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.पाणीपातळी ६४१.६८ मीटर आहे. एकूण साठा १२५.९१ दलघमी व उपयुक्त साठा ९८.६२ दलघमी आहे. रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले होते तेव्हा चासकमान धरणामध्ये ८४.१४ पाणीसाठा शिल्लक होता, तर पाणीपातळी ६४७.५८ मीटर एकूण साठा २०७.७३ दलघमी, उपयुक्त साठा १८०.५४ दलघमी इतका होता.
चासकमानमधून रब्बीच्या दुसऱ्या आवर्तनाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 1:46 AM