चासकमान : कोहिंडे बुद्रुक (ता. खेड) गावातील गणेशखिंड ठाकरवाडीमध्ये तान्हाजी कचाटे यांनी स्वत:च्या पैशातून विहीर खोदायला सुरुवात केली आहे. यामुळे आदिवासी बांधवांना करावी लागणारी मैलोन्मैलची भटकंती थांबणार असून, आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. या विहिरीचे पूजन सामाजिक कार्यकर्ते तान्हाजी कचाटे यांच्या हस्ते करण्यात आले.
कोहिंडे बुद्रुक गावापासून ४ किलोमीटर अंतरावर पाईट रोडवर उंच डोंगरावर गणेशखिंड येथे अनेक पिढ्यांपासून आदिवासी बांधव राहात असून, ठाकरवाडीमध्ये सुमारे २०० लोकवस्ती आहे. परंतु या वस्तीला पिण्याच्या पाण्याचा कुठल्याही प्रकारे स्रोत नसल्याने आदिवासी बांधवांना ऐन नोव्हेंबर महिन्यापासूनच पहाटे उठून पाणी आणण्यासाठी मैलोन् मैल भटकंती करावी लागते. त्यात विहिरीमधील पाण्याने दर वर्षी तळ गाठत असल्याने अनेकदा घरातील अबालवृद्धांबरोबरच विद्यार्थ्यांना हातातील कामधंदा बुडवून पाणी शेंदून आणावे लागत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत होते. तसेच कोंहिडे ग्रामपंचायतीने शासनदरबारी पाठपुरावा करूनही या आदिवासी बांधवांना पाणी देण्यासाठी अपयश आले होते. शासनाने आदिवासी बांधवांना कूपनलिका खोदून दिली असती तरी दशकापूर्वीच आदिवासी बांधवांचा पाणी प्रश्न निकाली निघाला असता. या सर्व प्रकाराचा पाठपुरावा करूनही कोणत्याही राजकीय पुढाºयाने दखल न घेतल्याने तसेच शासनाच्या निधीची वाट पाहण्यात वेळ घालविण्यापेक्षा आपली पिढीही दुष्काळात जाईल हे आदिवासी बांधवांच्या लक्षात आल्यावर हा विषय गावातील सामाजिक कार्यकर्ते तान्हाजी कचाटे यांच्या कानावर घातला. तान्हाजी कचाटे यांनी आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने पाणी हेच जीवन मानून कुठल्याही प्रकारे पैशाचा विचार न करता स्वत:च्या पैैशातून मागील वर्षीपासून टँकरने आदिवासी बांधवांना पाणीपुरवठा केला. या वर्षी कचाटे यांनी स्वत:च्या पैशातून विहीर खोदलेल्या विहिरीला पाणी लागले असल्याने डोक्यावरचा हंडा खाली उतरणार असल्याने महिलांच्या चेहºयावर हास्य फुलले होते. यावेळी तान्हाजी कचाटे, सुदाम कुटे, अमोल पिंगळे, प्रदीप कंद, हिरामण कंद, नामदेव कंद, भरत घोलप आदी उपस्थित होते.ग्रामस्थांची पाण्यासाठीची पायपीट थांबणार४ठाकरवाडीतील २00 पेक्षा अधिक असलेल्या लोकवस्तीला पिण्याच्या पाण्याच्या कोणताही स्त्रोत नसल्याने ग्रामस्थांना पाण्याची टंचाई४विहिरीमधील पाण्याने दर वर्षी तळ गाठत असल्याने अनेकदा पिण्याच्या पाण्यासाठीही नागरिकांना वणवण फिरावे लागत असल्याने त्यांच्या मध्ये नाराजी दिसून येत आहे.४गावातील पाण्याच्या टंचाईचा विचार करून तान्हाजी कचाटे यांनी स्वखर्चातून गावात विहीर खोदण्याच्या कामाला सुरूवात केली.