टिमविचे यंदा शताब्दी वर्ष असून विद्यापीठाचा ३४ वा पदवीप्रदान समारंभ आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचा पदवीप्रदान सोहळा ऑनलाइन होणार आहे. त्यात यावेळी ४१ विद्यार्थ्यांना पीएच.डी., ५ विद्यार्थ्यांना एम. फिल., कौशल्य विकास शाखेच्या २२६ विद्यार्थ्यांना आणि पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ३ हजार १२६ विद्यार्थ्यांना पदवी दिली जाणार आहे,असे विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक आणि प्रभारी कुलगुरु डॉ. गीताली टिळक यांनी सांगितले.
टिमविच्या वतीने यापूर्वी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, डेक्कन कॉलेजचे माजी कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर, प्राचार्य राम शेवाळकर, ज्येष्ठ नेते शरद पवार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट, विख्यात सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग आणि राणी बंग, ज्येष्ठ उद्योजक डॉ. आनंद देशपांडे, ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर, ‘सीरम’ कंपनीचे संस्थापक-कार्यकारी अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला आणि प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक प्रमोद चौधरी यांना डी. लिट.ने गौरविण्यात आले आहे.