साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे स्मारक समिती आळे यांचे माध्यमातून राजेंद्र आल्हाट यांनी गेली दहा वर्षे पाठपुरावा करत आंदोलने केली. 1ऑगस्ट 2020 पासून त्यांनी याकरिता बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. जवळपास 357 दिवस हे आंदोलन सुरू होते. दरम्यान आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर पवार ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ अध्यक्ष भाऊशेठ कु-हाडे सरपंच प्रितम काळे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्न डोके, ज्ञानेश्वर कु-हाडे ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ उपाध्यक्ष उल्हास सहाणे सचिव बाळासाहेब गुंजाळ, रोहिदास पाडेकर, किशोर कु-हाडे, संपत गुंजाळ, बी. आर. सहाणे माजी सरपंच वर्षाताई कु-हाडे ज्ञानराज प्रतिष्ठानचे धनंजय काळे, दिलीप वाव्हळ तुकाराम गाढवे, कोळवाडी उपसरपंच दिनेश सहाणे ग्रामपंचायत सदस्य बाजीराव लाड, ज्योतीताई शिंदे, मंगलताई तीतर, मंगेश कु-हाडे, सुरेश शिंदे, सुधीर वाव्हळ, गंगाराम कु-हाडे व गबाजी गुंजाळ यांचे उपस्थितीत नारळ पाणी दिल्यानंतर राजेंद्र आल्हाट यांनी हे आंदोलन मागे घेतले. प्रसन्न डोके व भाऊशेठ कु-हाडे यांनी सर्वांचे वतीने हे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
आळे येथे बेमुदत धरणे आंदोलन राजेंद्र आल्हाट यांनी नारळ पाणी घेऊन मागे घेतले.