मंचर/घोडेगाव : बैलगाडा शर्यती सुरु होण्यासंदर्भात नोटिफिकेशनवर आपण सही केली असून येत्या आठ ते दहा दिवसात बैलगाडा शर्यती सुरु होतील, अशी माहिती पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्लीत जाहीर केले आणि जिल्ह्यात बैलगाडा मालकांनी एकच जल्लोष केला. आंबेगाव तालुक्यातील बैलगाडामालकांनी पेढे वाढून आनंद साजरा केला. बैलगाडा शर्यतीचा मार्ग सुकर झाल्याची प्रतिक्रिया बैलगाडामालक जयसिंग एरंडे यांनी दिली़सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी कायम केल्यानंतर ग्रामीण भागातील शर्यती पूर्णपणे बंद झाल्या होत्या़ बैलगाडा मालकांत नाराजी पसरली होती़ परंपरागत सुरू असलेल्या कुलदैवतांच्या यात्रा ओस पडल्य होत्या़ बैलगाडा शर्यती बहुतेक ठिकाणी रद्द करण्यात आल्या होत्या़ केंद्र सरकारने शर्यती सुरू कराव्यात यासाठी मागणी होई लागली़ पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना यासंदर्भात बैलगाडामालक तसेच राजकीय पदाधिकारी भेटले होते़खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, भाजपाचे जयसिंग जयसिंग एरंडे त्याचबरोबर नुकतीच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व इतर खासदार डॉ़ प्रमोद बाणखेले आदींनी जावडेकर यांची भेट घेतली व शर्यती पुन्हा सुरू करण्याची विनंती केली होती़ पर्यावरणमंत्री जावडेकर यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला होता़ पारंपरिक खेळात क्रौर्य येऊ नये. बैलगाडा शर्यती क्रौर्य नाहीआदी अटी ऐकून बैलगाडा शर्यत सुरू करण्याचे सुतोवाच जावडेकर यांनी आज केल्याचे वृत्तवाहिनीवर झळकले़ त्यानंतर बैलगाडामालकांनी एकच जल्लोष केला़ मंचरच्या शिवाजी चौकात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली़ पेढे, लाडू एकमेकांना भरवून बैलगाडामालकांनी आनंद साजरा केला़ जयसिंग एरंडे, समाजसेवक दादाभाऊ पोखरकर, दत्ता थोरात, बाळासाहेब अरुडे, सरपंच विनोद मोढवे, डॉ़ प्रमोद बाणखेले, उपसरपंच शिवाजी निघोट, बाबाजी भक्ते, नीलेश टेमकर, पांडुरंग पाटील, विलास थोरात, किरण वाघ व बैलगाडामालक मोठ्या संख्येने उपस्थित होते़बैलगाडा शर्यत सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला आहे, अशी प्रतिक्रिया जयसिंग एरंडे यांनी दिली़ (वार्ताहर)
बैलगाडामालकांचा जल्लोष!
By admin | Published: December 05, 2014 5:15 AM