पुणे : पुण्यातील एका इम्पोर्ट एक्स्पोर्टचा व्यवसाय असलेल्या व्यावसायिकाला बनावट ई-मेल चा वापर करून फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. कुमार कोंडीबा शिनगारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शिनगारे हे इम्पोर्ट एक्स्पोर्ट चा व्यवसाय करत असून स्विर्त्झलँड येथील एका कंपनीबरोबर अनेक व्यावसायिक व्यवहार झाले आहेत. ते कंपनीच्या मेलवरून संवाद साधून सामानाची खरेदी करायचे.
स्विर्त्झलँड येथील कोटा संपलेला असून चीनमधून एक मशीन इम्पोर्ट करायचे आहे. सदर मशीनची किंमत ६७ हजार ९०० डॉलर आहे. त्यासाठी ५० टक्के रक्कम आधी करायचे आहे. असा मजकूरचा शिनगारे यांना ई-मेल आला. कॉन्ट्रॅक्ट मध्ये सांगितल्याप्रमाणे शिनगारे यांनी ५० टक्के रक्कम सांगितलेल्या बँक खात्यावर पाठवले. त्यांनतर मशीन पाठ्वण्याबाबत वेळोवेळी ई-मेल द्वारे विचारणा करत असताना कंपनीच्या शिक्क्याचे लेटर पाठवत शिपिंग एजंटला कॉन्ट्रॅक्टप्रमाणे उर्वरित रक्कम पाठवण्यास सांगितले. शिनगारे यांना संशय आल्याने कंपनीच्या अधिकाऱ्याला विचारणा केली तेव्हा असा कोणताही ई-मेल आमच्या कंपनीने पाठवला नसल्याचे सांगितले. तेव्हा ई-मेल आयडी पुन्हा तपासून पहिला असता मुख्य कंपनीच्या ई-मेल आयडीशी मिळता जुळता ई-मेल आयडी असल्याचे लक्षात आल्याने फसवणूक झाल्याचे शिनगारे यांच्या लक्षात आले. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कुमार घाडगे हे करत आहेत.