बारामती/लासुर्णे (जि. पुणे) : शेकडो किलोमीटरचे अंतर पायी कापत असताना क्षणाक्षणाला विठू आपल्यासोबत आहे, अशी भावना घेऊन वारकरी रिंगण सोहळ्यात सहभागी होतो. ‘आजि संसार सुफळ झाला गे माये देखियले पाय विठोबाचे’ अशी भावना अश्वरिंगणाचा अनुपम्य सोहळा अनुभवताना वारकऱ्यांच्या मनात असते. शीण घालवणारा, चैतन्याचा झरा म्हणजे रिंगण सोहळा. टाळ-मृदंगाचा होणारा गजर आणि विठूनामाचा जयघोष लहान-थोरांचा दांडगा उत्साह रिंगण सोहळ्याची भव्यता वाढवतो. याच भावनेत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले अश्वरिंगण बेलवाडी (ता. इंदापूर) येथे रविवारी मोठ्या उत्साहात पार पडले.या वेळी पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांसह परिसरातील ग्रामस्थांनी हजेरी लावली होती. या रिंगण सोहळ्याने भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. सणसर येथील मुक्कामानंतर तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे पहिल्या अश्वरिंगणासाठी बेलवाडी येथे ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ अशा जयघोषात आगमन झाले.सकाळी सात वाजल्यापासूनच रिंगणस्थळावर भाविकांनी गर्दी केली होती. अश्वरिंगण सोहळ्याची सुरुवात अक्षय मचाले यांच्या मानाच्या मेढ्यांचे रिंगण झाले. यानंतर टाळकरी, विणेकरी, तुळसी वृंदावन धारक महिला, झेंडेकºयाचे रिंगण झाले. या वेळी विठूनामाच्या गजरात रिंगणासाठी धावताना आबालवृद्धांचे भान हरपले. वारकरी भाविकांनी रिंगण सोहळ्यादरम्यान व अलिखित शिस्तबद्ध नियमांचे दर्शन घडवले. यानंतर मानाच्या अश्वरिंगणाला सुरुवात होते़>अपघात, हृदयविकाराने चौघांचा मृत्यूमहाबळेश्वरच्या माजी नगराध्यक्षांच्या सून कविता विशाल तोष्णीवाल (४२) यांचा टँकरच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. तरडगाव मुक्कामी असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे दर्शन घेऊन परतत असताना लोणंद-फलटण मार्गावर शनिवारी मध्यरात्री हा अपघात झाला, तसेच पालखीचे रविवारी सकाळी तरडगावातून फलटणच्या दिशेने प्रस्थान होत असताना, तीन वारकºयांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. कलुबा सोलने (६५), सुभाष गायकवाड (५५) यासह अन्य एकाचा मृतांमध्ये समावेश आहे.>वारकºयांकडून एसटी कर्मचाºयांना ‘महाप्रसाद’मुंबई : शेकडो मैल पायी चालणाºया वारकºयांच्या परतीच्या प्रवासासाठी महामंडळाकडून दरवर्षी हजारो एसटींची व्यवस्था केली जाते. वारकºयांना सुरक्षित घरी पोहोचविण्याची जबाबदारी एसटी कर्मचारी दरवर्षी पूर्ण करतात. यामुळे एसटी कर्मचाºयांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी यंदा वारकºयांकडून सुमारे ८ हजार एसटी कर्मचाºयांसाठी जेवणाची सोय करण्यात आली आहे. याचबरोबर, महामंडळाकडून कर्मचाºयांसाठी वैद्यकीय शिबिरेदेखील उभारण्यात येणार आहेत.>भाविकाचा हदयविकाराने मृत्यूपंढरपूर- विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला़ ही घटना रविवारी सायंकाळी ७ च्या सुमारास घडली़ पांडूरंग दत्तात्रय जंगमवार(७०) असे मयत भाविकाचे नाव आहे़
बेलवाडीत अश्वरिंगण सोहळा, टाळ-मृदंगाचा गजर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 5:48 AM