शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
4
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
5
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
6
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
7
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
8
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
9
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
11
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
13
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
14
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
16
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
17
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
18
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
19
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

वर्चस्ववादातून दोघांच्या भांडणात डॉक्टरांना ‘लाभ’; भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 11:50 AM

डॉक्टर भरतीवरून प्रत्येकी ५० लाख भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचा विरोधी पक्षातील नगरसेवकांचा आरोप

ठळक मुद्देशहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी राजीनामा दिल्याची उठविली हुल समर्थकांनी हुल

हणमंत पाटील-पिंपरी : लॉकडाऊनपूर्वी वायसीएम रुग्णालय व पी. जी. इन्स्टिट्यूटमधील ११८ डॉक्टरांच्या भरतीची प्रशासकीय प्रक्रिया फेब्रुवारीत पूर्ण झाली होती. त्यानंतर भरतीच्या अर्थकारणावरून सत्ताधारी भाजपच्या विधी समिती व मुख्य सभेने विषय मंजुरीला चार महिने टाळाटाळ केली. यावरून भोसरीचे आमदार व भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप समर्थक दोन गटांत वर्चस्वावरून वाद सुरू झाला. आर्थिक लाभ कोणत्याही एका गटाला मिळू नये,म्हणून चिंचवड गटाने घाईने बुधवारी विषय मंजूर केला. त्यात भांडणाचा ‘लाभ’ डॉक्टरांना झाला. 

सर्वसाधारण सभेत डॉक्टर भरतीवरून प्रत्येकी ५० लाख भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचा आरोप विरोधी पक्षातील नगरसेवकांनी केला. विशेष म्हणजे जगताप यांचा समर्थक गट डॉक्टर भरतीसाठी आग्रही होता. मात्र, लांडगे समर्थक नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे दोन्ही गटांतील वाद चव्हाट्यावर आले. आता पडद्यामागे रंगलेल्या आर्थिक उलाढालीची चर्चा रंगली आहे. वायसीएममधील व पदव्युत्तर संस्थेकरिता ११८ डॉक्टरांच्या नियुक्तीला राज्य शासन व महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी ग्रीन सिग्नल दिला होता. मात्र, कायमस्वरूपी भरतीसाठी ‘दाम’ची अपेक्षा सुरू झाली. भाजपच्या एका माजी पदाधिकाऱ्याने त्यासाठी पुढाकार घेतला. भाजपचे जुने निष्ठावंत पदाधिकारी अर्थकारण जुळविण्यासाठी तीन महिने राबले. बोलणीही झाली. संबंधित डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिस करण्यास परवानगी देण्याचे ठरले.

 ..... ‘पार्टी विथ डिफरन्स’ला फाटा... डॉक्टर भरतीच्या अर्थकारणाची चाहूल लागल्यानंतर भोसरीचा गट सक्रिय झाला. त्यामुळे दोन्ही गटांत कोण डॉक्टरांचा विषय पुढे नेणार, यावरून रस्सीखेच लागली. या वादामुळे ‘निष्ठावंत’ पदाधिकाऱ्याने काढता पाय घेतला. त्यामुळे भोसरी गटाला लाभ मिळू नये, म्हणून चिंचवड गटाने ‘अर्थहित’ बाजूला ठेऊन कोरोना योद्ध्यांना साथ देण्यासाठी मंजुरीचा निर्णय घेतला. त्यात उपसूचनेद्वारे डॉक्टरांनी खासगी प्रॅक्टिस न करण्याची अट टाकली. चिंचवड गटाने विषय मंजूर करण्याची घाई केल्याने भोसरी गटाने अनुपस्थित राहून बहिष्कार टाकला. पक्षाच्या ‘पार्टी विथ डिफरन्स’च्या तत्त्वाला फाट्यावर मारण्यात आले. गटबाजीमुळे भाजप बॅकफूटवर आल्याचे बोलले जात आहे.---शहराध्यक्षांच्या राजीनाम्याची हुल डॉक्टर भरतीच्या विषयात विश्वासात घेतले नसल्याची नाराजी व्यक्त करण्यासाठी शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या गटाने सर्वसाधारण सभेत अनुपस्थित राहून बहिष्कार टाकल्याचे समजते. त्यामुळेच आमदार लांडगे यांनी राजीनामा दिल्याची हुल समर्थकांनी उठविली. लांडगे देखील ‘नॉट रिचेबल’ झाले. त्यानंतर लांडगे स्वत:च सोशल मीडियावर येत राजीनाम्याची चर्चा चुकीची असल्याचे स्पष्ट करून या विषयावर पडदा टाकला. पक्षात गटबाजी नसल्याचेही त्यांनी तिथेच स्पष्ट केले. 

....................

‘धूसफूस-कुजबुज’ कशावरून...शेतकऱ्यांना आरक्षणाचा मोबदला देणे वाकडमधील विकासकामे मार्गी लावणे स्थायी समिती अध्यक्ष मारहाण प्रकरणडॉक्टर भरतीच्या विषयाचा मंजुरी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाMLAआमदारdoctorडॉक्टरshravan hardikarश्रावण हर्डिकर