शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

‘बंगाली पोस्टर बाबां ’ मुुळे पीएमपी हैराण 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 4:18 PM

मागील काही महिन्यांपासून हे प्रमाण वाढले असून बंगाली बाबांचा आकडा जवळपास २० च्या घरात गेला आहे. 

ठळक मुद्देतंत्र-मंत्राच्या जाहिरातींचा ऊत : पोलिसांकडे तक्रार करून कारवाई नाहीया बाबांवर जादुटोणा विरोधी कायदा व मालमत्ता विदूपण कायद्यांर्गत कारवाई होणे आवश्यक बसमधील जाहिराती काढण्यासाठी पीएमपी ला स्वतंत्र कर्मचाऱ्यांची करावी लागते नियुक्ती

पुणे : पती-पत्नीतील भांडण, व्यवसायातील मंदी, गृहकलह, प्रेमविवाह अशा एक ना अनेक समस्यांपासून केवळ काही तासांत मुक्ती मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या बंगाली बाबांच्या पोस्टरने पीएमपी प्रशासन हैराण झाले आहे. दुआ और ताबीज से तकदीर बदलने वाले, जटील से जटील समस्याओं ३ घंटा में तूफानी समाधान या स्वरूपाची जाहिरात करून नागरिकांना भुलविले जात आहे. मागील काही महिन्यांपासून हे प्रमाण वाढले असून बंगाली बाबांचा आकडा जवळपास २० च्या घरात गेला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)ची बसस्थानके व बसमध्ये अशाप्रकारच्या जाहिरातील चिटकविल्या जातात. बसने प्रवास करताना खिडकीजवळ बसणाऱ्या प्रवाशांना पुण्यनगरीचे दर्शन घडण्याऐवजी बंगाली बाबांच्या पोस्टरचे दर्शन घडते. तसेच बसमध्ये अन्यत्रही या जाहिराती दिसतात. यामुळे बस व स्थानकांचे विद्रुपीकरण होत आहे. पीएमपी प्रवासी मंचचे कार्यकर्ते निलकंठ मांढरे हे याबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, मागील पाच-सहा महिन्यांपूर्वी तीन-चार बाबांचेच स्टीकर्स बसमध्ये दिसत होते. आता हा आकडा जवळपास १९ पर्यंत वाढला आहे. त्यामुळे थेट चमत्कार करून समस्या सोडविण्याचा दावा केला जात आहे. समस्येचे समाधान करण्याचे प्रत्येक बाबाचे तासही वेगवेगळे आहेत. सर्व जाहिरातींवर एक-दोन मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत.या जाहिरातील काढताना पीएमपी प्रशासनही हैराण झाले आहे. बसमधील जाहिराती काढण्यासाठी पीएमपी ला स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागते. त्या लवकर निघत नसल्याने अर्धवट स्वरूपात ठेवल्या जातात. त्यामुळे बस, स्थानके विद्रुप दिसतात. मांढरे यांनी याबाबत पीएमपीकडे अनेकदा तक्रार केली आहे. मात्र, त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. काही आगारांमधून पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे. त्यावरही कारवाई केली जात नाही. केवळ पोलिसांकडे तक्रार देण्याते सोपस्कर पार पाडले जात आहेत. या बाबांवर जादुटोणा विरोधी कायदा व मालमत्ता विदूपण कायद्यांर्गत कारवाई होणे आवश्यक आहे. पण अद्याप एकाही बाबावर कारवाई झालेली नाही, असे मांढरे यांनी सांगितले.---बस व स्थानकांवर लावलेल्या अनधिकृत जाहिराती सातत्याने काढल्या जातात. आगार प्रमुखांकडून याबाबत पोलिसांत तक्रारही केली जाते. रात्रीच्या वेळी किंवा बसस्थानकात बस उभी असताना काही जण या जाहिराती लावतात. त्यामुळे त्यांना पकडणे शक्य होत नाही.- सुभाष गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी........- निलकंठ मांढरेहे आहेत काही बंगाली बाबा- बाबा खान बंगाली- गुरू मूसा खान बंगाली- बाबा रजा खान बंगाली- गुरू मूशा जी- पाशा बंगाली- गुरू सिकंदर बंगाली- गुरू माहन्त अघोरी-------------साईबाबांचा आधारबहुतेक जाहिरातींवर साईबाबांच्या छायाचित्रांचा गैरवापर केला जात आहे. या माध्यमाधून नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच विविध धर्मांच्या प्रतिकांचाही वापर केला जात आहे. मागील काही महिन्यांत या बाबांच्या जाहिरातील वाढल्या आहेत. यामुळे बसचे विद्रुपीकरण होत असून त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएल