पुणे : ज्योतिषशास्त्राची कोणतीही पद्धत कमी दर्जाची नाही. सर्वच पद्धती सर्वश्रेष्ठ आहेत. त्या पद्धतींचा उपयोग आपण कसा करतो, हे महत्त्वाचे असते. दादा जकातदारांनी दिलेल्या शिकवणुकीचा उपयोग आजवरच्या आयुष्यात नेहमीच होत आला आहे, अशा भावना कृष्णमूर्ती पद्धतीचे प्रसारक व अभ्यासक कांतिलाल मुनोत यांनी व्यक्त केल्या.पंडित दादासाहेब जकातदार प्रतिष्ठानतर्फे त्यांच्या सोळाव्या स्मृतिदिनानिमित्त ‘मंदाश्री पुरस्कार’ समारोह आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी प्रा. भारती कोशे यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्र. ल. गावडे, डॉ. वा. ल. मंजूळ, चंद्रकांत शेवाळे, सतीश जकातदार, नंदकिशोर जकातदार, विजय जकातदार उपस्थित होते.कोणतेही शिक्षण कधीही वाया जात नाही. त्याच्या आयुष्यात कधी ना कधी उपयोग होतोच. तसेच कुठल्याही विद्येचा वापर केवळ पैशासाठी करू नका. जेवढे समाजोपयोगी कार्य करता येईल तितके करा, असे कोशे म्हणाले.ज्योतिर्विद्या शिकणे, वेळोवेळी त्या विद्येचा गरजेनुसार उपयोग करणे व त्याचा प्रसार करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे गावडे यांनी सांगितले. याशिवाय एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी संपूर्ण कुटुंबाचा पाठिंबा असणे आवश्यक असते. त्याप्रमाणे जकातदार यांच्या सर्व पिढ्यांचा या कार्यासाठी नेहमीच पाठिंबा असतो, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
ज्योतिषशास्त्राच्या सर्वच पद्धती सर्वश्रेष्ठ
By admin | Published: February 08, 2015 12:04 AM