पुणे : उत्तम बंडू तुपे हे थोर साहित्यिक आहेत. महाराष्ट्राला त्यांचा अभिमान आहे. परंतु, असा साहित्यिक दयनीय जीवन जगत असल्याचे माध्यमातून समजले. त्यामुळे मुख्यमंत्री आणि शासन अशा थोर साहित्यिकाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले. ते तुपे यांच्या घरी भेट देण्यासाठी आले होते. त्याचबरोबर त्यांच्या घराचा आणि वैद्यकीय उपचाराचा प्रश्नही सरकार सोडवणार असल्याचे तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांचा दैनंदिन खर्चाची कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे शासन स्तरावर चालू असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे यांनी महापालिकेच्या आरोग्य योजनेतून त्यांना वैद्यकीय मदत तसेच आरोग्य योजनेतून त्यांना आहे. त्याठिकाणी चांगले घर महापालिका आणि नगरसेवकाच्या माध्यमातून बांधून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले .यापुढे अशा दुर्लक्षित साहित्यिकांना अडचणीच्या काळात कायमस्वरूपी मदत करण्यासाठी महापालिकेत ठराव करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आणि डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी प्रत्येकी २५ हजार रुपये धनादेशद्वारे तुपे यांना वैयक्तिक मदत म्हणून दिले.
थोर साहित्यिक उत्तम तुपेंच्या शासन पूर्णपणे पाठीशी उभे राहणार : दिलीप कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 6:29 PM
यावेळी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आणि डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी प्रत्येकी २५ हजार रुपये धनादेशद्वारे तुपे यांना वैयक्तिक मदत म्हणून दिले.
ठळक मुद्देमुख्यमंत्री आणि शासन अशा थोर साहित्यिकाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार