पुणो : बरीचशी पुस्तके आपल्या वाचनामध्ये गोडी निर्माण करतात. मात्र, मुलांना एखादे पुस्तक वाचलेले समजते का, असा प्रश्न पालकांना पडतो. मुलांना जर पुस्तकातील वाचलेले समजत असेल, लेखकाने केलेल्या कोटय़ा आणि लेखनातील खुबी मुलांना समजत असतील, तर ते वाचन त्यांच्यासाठी सवरेत्तम असते, असे मत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ
डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले.
‘अक्षरधारा’ प्रकाशनतर्फे मायमराठी शब्दोत्सवांतर्गत ‘पुस्तकांच्या जगात’ या विषयावर त्यांचे भाषण झाले. गणितज्ञ मंगला नारळीकर, राजहंस प्रकाशनचे डॉ. सदानंद बोरसे, मांडके हिअरिंग सव्र्हिसेसच्या डॉ. कल्याणी मांडके उपस्थित होते.
नारळीकर म्हणाले, ‘‘पुस्तके वाचण्याची आवड मला शालेय वयापासूनच होती. मात्र, ही आवड हळूहळू निर्माण होत
गेली.
सुरुवातीला रहस्यकथा वाचत असे. शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर परदेशात जाण्याची संधी मिळाली. त्या ठिकाणीही वाचनाची आवड जपली. तेथे प्रख्यात लेखकांशी माझी भेट झाली. (प्रतिनिधी)
4नव्या पिढीतील मुलांसाठी टीव्ही हा वाचनातील सर्वात मोठा अडथळा आहे. मात्र, साहित्यामध्ये टीव्हीपेक्षाही अधिक खिळवून ठेवण्याची ताकद आहे. मुलांना लेखनातील खुबी समजल्या, तरच ते योग्य वाचन होय. मुलांनी विनोदी वा्मय वाचावे. त्यामुळे जीवनातील कठीण आणि गंभीर प्रसंगांना सामोरे जाण्याची कल्पकता त्यांच्यामध्ये विकसित होईल,’’ असे नारळीकर म्हणाले.
मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी पालकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. मात्र, आजच्या जगात मुलांची अनेक कामे आउटसोर्स केली जातात. पालक आणि मुलांचे भावनिक संबंध दृढ झाले तर, दोघेही मिळून वाचनसंस्कृतीला गती मिळवून देऊ शकतात.- मंगला नारळीकर, गणितज्ञ