शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

गृहखरेदीसाठी सर्वात योग्य वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:11 AM

कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात क्रेडाईच्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी नुकतीच पिंपरी चिंचवड येथील प्रसिद्ध बांधकाम ...

कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात क्रेडाईच्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी नुकतीच पिंपरी चिंचवड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व फरांदे प्रमोटर्स अॅण्ड बिल्डर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल फरांदे यांची निवड झाली आहे. एप्रिल २०२१ ते मार्च २०२३ दरम्यान अनिल फरांदे हे क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष म्हणून, तर अरविंद जैन हे याच काळात क्रेडाई पुणे मेट्रोचे सचिव म्हणून कार्यरत असतील. आपल्या कार्यकाळात त्यांचे ‘व्हिजन’ काय असेल, या संदर्भात त्यांच्याशी हा खास संवाद ...

आजवर असलेला बँकांचा सर्वांत कमी व्याजदर, महिलेच्या नावावर घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात मिळत असलेली सवलत, व्याजाच्या रकमेवर मिळणारी करसवलत (टॅक्स बेनिफिट) आणि बांधकाम व्यावसायिक देत असलेली न भूतो न भविष्यती अशा गृह खरेदीच्या ऑफर्स या बाबी सध्याच्या काळात गृहखरेदीच्या व गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्याने गृहखरेदीसाठी ही योग्य वेळ आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात घर घेण्याची इच्छा असलेल्यांनी लागलीच ही खरेदी करा, असा सल्लाही अनिल फरांदे यांनी दिला आहे.

बांधकाम क्षेत्राविषयी माहिती देताना अनिल फरांदे म्हणतात, “शेतीनंतर बांधकाम क्षेत्र हे देशातील रोजगार उपलब्ध करून देणारे सर्वांत मोठे क्षेत्र असून, किमान २५० व्यवसाय या क्षेत्राशी संलग्न आहेत, तर जीडीपीमधील या क्षेत्राचा वाटा हा ५ ते ७ % इतका आहे. मात्र, असे असले तरी गेली तीन वर्षे हे क्षेत्र स्थित्यंतरांचा सामना करीत आहे. मागील वर्षी आलेल्या कोविड १९ च्या महामारीचा फटका या क्षेत्राला बसला आहे. इतकेच नव्हे तर बांधकाम मजुरांचे स्थलांतर, बँकेचे व्याजदर, मुद्रांक शुल्क, स्टील व सिमेंटच्या किंमती आदी बाबी या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात परिणाम करतात. त्यामुळे या गोष्टींवर बांधकाम क्षेत्राचे नजीकचे भविष्य अवलंबून आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.”

अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारने या क्षेत्राला जास्तीत जास्त मदत करावी, अशी मागणी क्रेडाईच्या माध्यामातून आम्ही वेळोवेळी करीत आलो आहोत आणि यानंतरही सातत्याने करत राहू. इतर गोष्टींबरोबर सिमेंट व स्टीलच्या किमतीवर नियंत्रण ठेवणे हे यामध्ये अपेक्षित असून सध्याची परिस्थिती पाहता या मागणीची पूर्तता तातडीने झाल्यास बांधकाम क्षेत्राला निश्चित मदत मिळेल, असे मला वाटते.

२०२०-२१ च्या सुरुवातीला कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने कुटुंबासोबत राहण्यासाठी स्वतःचे घर असण्याचे फायदे प्रकर्षाने नागरिकांच्या लक्षात आले. शिवाय याचदरम्यान बँकेचा व्याजदर हा ऐतिहासिकरीत्या कमी झाला, मुद्रांक शुल्कात देखील राज्य सरकारने सवलत दिली आणि बांधकाम व्यावसायिकांकडून याच दरम्यान घरखरेदीच्या अनेक ऑफर्सदेखील ग्राहकांना दिल्या गेल्या. या सर्व बाबींमुळे २०२१ च्या पहिल्या तिमाहीमध्ये गृहखरेदीचा अनपेक्षित अनुभवसुद्धा आला, मात्र कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे हे फार काळ टिकले नाही.

यानंतर मुद्रांक शुल्कातील सवलत संपुष्टात आली, शिवाय कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये सिमेंट आणि स्टीलच्या किमती या निर्णायकपणे चढ्या राहिल्या. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक देखील सवलती देण्याच्या परिस्थितीत राहिले नाहीत. याबरोबरच आजवर बांधकाम व्यावसायिक देत असलेल्या सवलती देणे आता यानंतर शक्य होणार नसून, उलट घरांच्या किमती वाढतील असा अंदाज आहे. यामध्ये अध्यक्ष म्हणून आजवर मिळत असलेल्या सवलती यानंतरही मिळाव्यात यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करेल.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीए अंतर्गत अनेक ठिकाणी प्रकल्पांच्या जागा निश्चित झाल्या असल्या तरीही या ठिकाणी रस्ते, वीज, पाणी यांसारख्या प्राथमिक सुविधा मात्र अद्याप देण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे या सुविधा लवकरात लवकर उपलब्ध व्हाव्यात यासाठी देखील मी पाठपुरावा करणार आहे.

सध्याच्या परिस्थितीत बांधकाम कामगारांचे स्थलांतर हा या व्यवसायासमोरील सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, हेच लक्षात घेत कामगारांची राहण्याची योग्य सोय करण्याबरोबरच त्यांच्या आरोग्य तपासण्या, आवश्यक असल्यास कोविड चाचण्या, विलगीकरणाची व गरज पडल्यास रुग्णालयात दाखल करण्याची सर्व सोय बांधकाम व्यावसायिक करीत आहेत. कोविडच्या काळात कामगारांना मोफत जेवण, धान्य, औषधे, वैद्यकीय चाचण्या आदींवर देखील भर देण्यात आला आहे. क्रेडाई पुणे मेट्रो एक संस्था म्हणून कामगारांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असून या सर्व बाबी बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी काम करीत असते, असे अनिल फरांदे सांगतात.

याखेरीज पुणे शहराचा विचार केल्यास, देशात कोविडचा सर्वाधिक फटका बसलेल्या शहरांत पुणे शहराचा समावेश होतो. त्यामुळे पर्यायाने शहरात लागलेल्या निर्बधांचा फटका देखील बांधकाम क्षेत्राला बसला. बांधकाम प्रकल्पाची ठिकाणे सुरू असली तरी, बांधकाम व्यावसायिकांची कार्यालये, बांधकाम साहित्याचा पुरवठा करणारी दुकाने अद्याप पूर्णपणे सुरू नसल्याने पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे बांधकाम पूर्ण करण्यासाठीची रेराची मर्यादा वाढवून मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही फरांदे यांनी नमूद केले. याबरोबरच बँका आणि आरबीआयकडे देखील क्रेडाई मदतीसाठी पाठपुरावा करीत आहे.

केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता संकटे आली असली तरीही, डगमगून न जाता क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने सामाजिक बांधीलकीच्या माध्यमातून मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील कोविड १९ वर उपचार करीत असलेल्या महापालिका रुग्णालयांना नुकतेच १५ व्हेंटिलेटर व १० हाय फ्लो ऑक्सिजन डिव्हाईस उपलब्ध करून देण्यात आले. याबरोबरच बाणेर येथे २०९ खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी देखील क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने पुणे महानगरपालिकेला मदतीचा हात देण्यात आला आहे. शिवाय कोविड महामारीला हरवीत अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दृष्टीने एक पाऊल म्हणून आता क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने बांधकाम कामगारांच्या लसीकरणाची मोहीमदेखील तातडीने सुरु करण्यात येणार आहे. पुणे क्रेडाई मेट्रोच्या वतीने पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीएच्या सहकार्याने या भागातील १००% बांधकाम कामगारांचे लसीकरण यादरम्यान करण्यात येईल.