सासवड : पुरंदरच्या लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत जनतेचा विश्वासघाताच केला. विकासकामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू द्यायची नाहीत, अशी घातक प्रवृत्ती आहे. काँग्रेस पक्षाला आत्तापर्यंत उमेदवार देण्याची संधी नव्हती. यावेळी मात्र संजय जगताप यांच्या रूपाने काँग्रेसचा उमेदवार आहे. काँग्रेसला
निवडून आणण्याची ऐतिहासिक संधी पुरंदरच्या मतदारांना आहे. या निवडणुकीत इतिहास घडेल, अशी माझी खात्री आहे. पुरंदरच्या जनतेचा विश्वासघात करणा-यांना आता ही जनता धडा शिकवेल, असा विश्वास महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला.
माळशिरस (ता. पुरंदर) येथे झालेल्या काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. शिवसेना, भाजपा यांची मुख्यमंत्री कोण होणार यावरून भांडणो सुरू आहेत. राष्ट्रवादीने सिंचन घोटाळा करून शेतक-यांची वाट लावली. परंतु, आता या घोटाळ्यावर भाजप - शिवसेना बोलत नाहीत. याचाच अर्थ यांच्यामध्ये काहीतरी सेटिंग झाली आहे असा होतो. स्थानिक आमदार माङयावरही टिका करतात, असे मला समजले. पक्षाने आदेश दिल्यामुळे मी पुणो शहरातून निवडणूक लढविली. परंतु, यांनी मात्र निवडणुकीपूर्वी फक्त गाजावाजा केला व नंतर तडजोड करून गप्प बसले. अशी प्रवृत्ती पुरंदरमधून घालवून देण्याची ही संधी आहे. यासाठी सासवडमध्ये विकासकामे केलेल्या संजय जगताप यांनाच निवडून द्यावे, असे आवाहनही डॉ विश्वजीत कदम यांनी केले.
संजय जगताप यांनी पुरंदर उपसा योजना या दोन महिन्यातच शेतक-यांच्या सोसायटय़ा करून त्यांच्या ताब्यात देणार असल्याचे सांगून पुरंदर उपसा योजना नीट चालवत नाहीत, योजनेच्या पाण्याचे चारपट पैसे घेतात. ही परिस्थिती मी बदलणार आहे असे सांगितले. एक आजी आमदार, एक
माजी आमदार व एक माजी आमदारांची कन्या असे तीन उमेदवार माङयासमोर उभे आहेत. यांना स्वत: चे गावदेखील सुधारता आले नाहीच; परंतु, ते देखील गावी राहिले नाहीत. विकासावर बोलण्याऐवजी ते माङयावर व्यक्तिगत टीका करीत सुटले आहेत. पण, पुरंदर - हवेलीतील जनतेला त्यांचा खोटारडेपणा समजला असल्यामुळे ते आता यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत, याचा मला विश्वास आहे, असेही जगताप यावेळी म्हणाले.
यावेळी नायगाव, चांबळी येथील कार्यकत्र्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तालुका युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष गणोश मेमाणो यांनी प्रास्ताविक
केले. बाळासाहेब कड यांनी सूत्रसंचलन केले तर बारामती लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. सचिन दुर्गाडे यांनी आभार मानले. याप्रसंगी जि.
प. सदस्या मनीषा काकडे, पं. स. सदस्य दत्ता झुरंगे, प्रदीप पोमण, नंदकुमार जगताप, देवा नाझीरकर, मंदार गिरमे, माउली यादव, गणोशकाका जगताप, एकनाथ यादव, नरेंद्र जगताप, वैशाली बोरावके, संभाराजे जगताप, भैया महाजन यांसह माळशिरस व परिसरातील नागरिक, कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
4सासवड : पुरंदर हवेलीचे कॉँंग्रेस पक्षाचे उमेदवार संजय जगताप यांच्या प्रचारासाठी कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी व मुख्यमंत्नी पृथ्वीराज चव्हाण यांनी सभा घेतली. या वेळी त्यांनी संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली सासवड नगर परिषदेचे काम उत्कृष्ट चालले असून महाराष्ट्रात ‘क’ वर्ग नगर परिषदेत ही नगरपालिका पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगितले. राहुल गांधी यांनी सोपानकाका बँक, शिवाजी शिक्षण मंडळ, पुरंदर नागरी पतसंस्था, पुरंदर मिल्क या संस्थांच्या कामातून तरुणांना रोजगार मिळाल्याचेही आवर्जून सांगितले. तसेच या मतदार संघाचा सासवडप्रमाणो विकास करण्यासाठी जगताप यांना निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी केले. संजय जगताप यांच्या कार्याची वरिष्ठ पातळीवर दखल घेतल्याचे दिसते, असे सासवड नगरपरिषदेचे उपाध्यक्ष सुहास लांडगे यांनी सांगितले.