पुणे : स्वच्छतेचा वसा आता स्वत:साठीच नव्हे तर दंड टाळण्यासाठीही पाळावा लागणार आहे. तुमच्या घरातील फ्रिजमधील पाणी न बदलल्याने जरी डास होत असल्याचे आढळून आले तर महापालिकेतर्फे हजार रुपयाचा दंड दररोज केला जाणार आहे. कीटकजन्य आजारांना कारणीभूत असलेल्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने तयार केलेल्या उपविधी (नियमावली) २0१३ ला मुख्यसभेची मान्यता मिळाल्याने तो राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहेशहरातील कीटकजन्य आजारांवर नियंत्रण आणण्यास महापालिकेस आणखी कठोर पावले उचलणे शक्य होणार असल्याचे महापालिकेच्या कीटकप्रतिबंधक विभागाच्या प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत शहरात मोठय़ा प्रमाणात कीटकजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. हे आजार प्रामुख्याने डासांपासून होत असल्याने या आजारांवर नियंत्रणासाठी महापालिका स्तरावर नियमावली करावी असे आदेश राज्य शासनाने ऑक्टोबर १९९६ मध्ये दिले होते. त्याचा आधार घेत मागील वर्षी महापालिकेने पुणे महानगरपालिका (मलेरिया, डेंग्यू व डासांपासून उत्पन्न होणारे इतर आजार तसेच कीटकांपासून होणारे रोग) उपविधी २0१३ तयार केली होती. या उपविधीनुसार, खासगी जागा तसेच शासकीय जागांमध्ये डासांची उत्पत्ती आढळल्यास महापालिका प्रशासनाकडून दंडाची तरतूद तसेच फौजदारी गुन्हा दखल करण्याबाबत नियम प्रस्तावित करण्यात आले होते. या उपविधीसाठी सप्टेंबर २0१३ मध्ये महापालिकेने एक महिन्याची मुदत देऊन नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागविल्या होत्या. मात्र, त्यासाठी शहरातील एकाही नागरिकाने अथवा संस्थेने हरकत घेतलेली नाही. त्यामुळे प्रशासनाकडून ही उपविधी महिला आणि बालकल्याण समितीच्या माध्यमातून मुख्यसभेच्या अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात येणार होती. मात्र, समितीने पुन्हा एकदा हरकती मागविण्याचा ठराव करून ही उपविधी मुख्यसभेत मान्यतेसाठी पाठविली होती. मात्र, मुख्यसभेत त्यास उपसूचना देऊन ती थेट राज्य शासनाकडे पाठविण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आता उपविधीस राज्य शासनाच्या मान्यतेची औपचारिकता बाकी असल्याचे डॉ. जाधव यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) शहरातील कीटकजन्य आजारांवर नियंत्रण आणण्यास महापालिकेस आणखी कठोर पावले उचलणे शक्य होणार असल्याचे महापालिकेच्या कीटकप्रतिबंधक विभागाच्या प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांनी सांगितले. अशी होणार तपासणी
खासगी डॉक्टरकडे डासांमुळे होणार्या आजाराचा रुग्ण आढळून आला तर त्या परिसरातील घरांची तपासणी होणार. यामध्ये फ्रिज किंवा टेरेसवर जर डासांची उत्पत्ती आढळली तर संबंधित घरमालकास एक हजार रुपये दंड होणार आहे. त्यानंतरही त्याने जर स्वच्छता केली नाही तर दररोज एक हजार रुपये दंड होणार आहे.
खासगी जागा तसेच शासकीय जागांमध्ये डासांची उत्पत्ती आढळल्यास महापालिका प्रशासनाकडून दंडाची तरतूद तसेच फौजदारी गुन्हा दखल करण्याबाबत नियम प्रस्तावित करण्यात आले होते. या उपविधीसाठी सप्टेंबर २0१३ मध्ये महापालिकेने एक महिन्याची मुदत देऊन नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागविल्या होत्या. मात्र, त्यासाठी शहरातील एकाही नागरिकाने अथवा संस्थेने हरकत घेतलेली नाही. २0१४२0१३२0१२डेंग्यू१0६८७३१0८५चिकुनगुनिया३४८३0मलेरिया३३१५११४१