रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे श्री महागणपती मंदिर सभागृहात आयोजित केलेल्या भाद्रपद गणेशोत्सवाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या वेळी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त डॉ. संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर, ॲड. विजयराज दरेकर, सरपंच सर्जेराव खेडकर, देवस्थानचे व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, पोलिस कर्मचारी नानासाहेब काळे, सागर गायकवाड, संतोष औटी उपस्थित होते.
प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिलेल्या आदेशानुसार मंदिर दर्शनासाठी बंद असून, श्री महागणपतीची द्वारयात्रा फक्त विश्वस्तांच्या उपस्थितीत एका वाहनातून नेण्यात येऊन त्या ठिकाणी विधिवत पूजा करण्यात येईल. दर्शनासाठी पालखी मार्ग व संबंधित गावी कोणीही गर्दी करू नये अशा स्पष्ट सूचना पोलीस निरीक्षक मांडगे यांनी या बैठकीत दिल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाद्रपद गणेशोत्सव काळात रांजणगाव गणपती येथील मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असून परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गणेशोत्सव व द्वारयात्रा काळात कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही पोलीस निरीक्षक मांडगे यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्णयानुसार मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद असून द्वारयात्रा व भाद्रपद गणेशोत्सव शासकीय आदेशानुसार केवळ धार्मिक विधी व पूजा होणार असल्याचे देवस्थानच्या विश्वस्तांनी यावेळी सांगितले.
फोटो:रांजणगाव गणपती मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
070921\img-20210907-wa0106.jpg
रांजणगाव गणपती मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.