वाल्हे : गावठाणातील मुख्य बाजारपेठेतील शिवाजी चौक ते शहीद शंकर शिंदे चौक हा रस्त्याला जिल्हा परिषदेकडून निधी मंजूर होताच शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य शालिनी पवार यांनी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले. मात्र, गावातील राष्ट्रवादीचे सरपंचाना विश्वासात घेतले नाही, की भूमिपूजनाला बोलविले नाही; त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांदा स्वतंत्रपणे भूमिपूजन करीत राष्ट्रवादी-शिवसेनेतील श्रेयवाद चव्हाट्यावर आणला.
जिल्हा परिषदेच्या २५१५ ग्रामविकास निधीतून या रस्त्यासाठी १४ लाख ३३ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याचा श्रेय लाटण्यासाठी जिल्हा परिषदेतील शिवसेना सदस्य आणि ग्रामपंचायतीतील राष्ट्रवादीचे सरपंच यांच्यात चांगलीच जुंपली आहे.येणाºया लोकसभा आणि विधानसभेच्या पार्श्वभुमीवर विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी जणू स्पर्धा लागली आहे. त्यामुळेच रविवारी शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य शालिनी पवार यांनी रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन थाटात केले. मात्र त्याला गावातील प्रथम नागरिक असलेल्या सरपंचांना बोलाविलेच नाहीत. या कार्यक्रमाला शालिनी पवार यांचे समर्थक माजी पंचायत समिती सभापती गिरीष नाना पवार, माजी पंचायत समिती सदस्य शिवाजी पवार, माजी सरपंच सविता भुजबळ, मोहन पवार, डॉ कांबळे, आडाचीवाडी सरपंच दत्तात्रेय पवार यांच्या उपस्थितीत होते. आज सोमवारी सकाळी सरपंच अमोल खवले यांनी पुन्हा एकदा याच कामाचे भूमीपूजन केले त्यावेळी माजी सरपंच दत्ता अण्णा पवार, महादेव चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत भुजबळ, हनुमंत पवार, प्रकाश पवार, माजी सदस्य दिपक कुमठेकर, सुहास खवले, अंकुश पवार, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष सतीश सूर्यवंशी, अनिल भुजबळ, डॉ. रोहीदास पवार, तानाजी भुजबळ, आदी उपस्थित होते.शिवाजी पवार दोन्ही उद्घाटनांना उपस्थितजिल्हा परिषद सदस्य आणि सरपंच यांच्या वादामध्ये पंचायत समितीने पडू नये आणि दोघांंनाही नाराज करायला नको, यासाठी पंचायत समितीचे माजी सदस्य शिवाजी पवार हे दोन्ही उद््घाटनांना उपस्थित होते. मात्र, दोन्ही भाषणात त्यांनी या श्रेयवादाचा विषय टाळला.