गणेश जयंतीनिमित्त गणपती मंदिरात दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट करण्यात आली आहे. दुपारी भजनाचा कार्यक्रम झाला, तर संध्याकाळी महाप्रसादाने सांगता होणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष धनंजय काकडे यांनी सांगितले.
गणेश जयंतीनिमित्त येथील शिवगणेश तरुण मंडळाच्या गणेश मंदिरात सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. रविवारी संध्याकाळी मंदिर व परिसर स्वच्छता करत धुऊन घेण्यात आला व निर्जंतुकीकरण करण्यात आला. सोमवारी सकाळी मंदिरातील गणेशमूर्तीला अभिषेक घालण्यात आला. दुपारी बारा वाजता जन्मोत्सव व पाळणागायन झाले तर दुपारी साईनाथ भजनी मंडळ नीरा यांच्या महिलांसह गायनाचा कार्यक्रम झाला. संध्याकाळी महाआरतीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. नीरा शहरात सार्वजनिक गणेशोत्सवात सर्वात उंच गणेशमूर्ती शिवगणेश तरुण मंडळाची असते. मंडळाचे उपाध्यक्ष अनिकेत सोनवणे, खजिनदार कुमार मोरे, सचिव सुधाकर शिंदे व कार्यकर्त्यांनी गणेश जयंतीसाठी परिश्रम घेतले.